AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रियलमी 16T 5G पासून ते मोटो G37 पॉवर पर्यंत ‘हे’ 4 नवीन फोन पुढच्या आठवड्यात भारतात होणार लाँच

पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत चार नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. तर यामध्ये कोणत्या कंपनीचे फोन कोणत्या दिवशी आणि फीचर्ससह लाँच होतील ते जाणून घेऊयात.

रियलमी 16T 5G पासून ते मोटो G37 पॉवर पर्यंत 'हे' 4 नवीन फोन पुढच्या आठवड्यात भारतात होणार लाँच
smartphonesImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 18, 2026 | 7:48 AM
Share

तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थांबा, कारण पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत चार नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. Realme, Motorola आणि HMD चे नवीन स्मार्टफोन्स पुढच्या आठवड्यात मोठ्या धमाकेदारपणे पदार्पण करतील. चला जाणून घेऊया कोणते फोन कोणत्या दिवशी लाँच होतील आणि त्यांमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील.

भारतात Realme 16T 5G स्मार्टफोन यादिवशी होणार लाँच

हा नवीन रियलमी फोन पुढच्या आठवड्यात 22 मे रोजी दुपारी 12 वाजता ग्राहकांसाठी लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर हा फोन कंपनीच्या वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवरही उपलब्ध होईल.

रियलमी 16T 5G ची वैशिष्ट्ये

फ्लिपकार्टवर या फोनसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्यावरून असे दिसून येते की यात 8000 mAh क्षमतेची बॅटरी आहे. त्याचबरोबर असा दावा केला जात आहे की, फोनची बॅटरी तीन दिवस अखंड चालते आणि सात वर्षापर्यंतची बॅटरी लाईफ असेल. हा फोन 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच केला जाईल. याव्यतिरिक्त, यात रिव्हर्स चार्जिंगची सुविधा देखील आहे.

भारतात Moto G37 स्मार्टफोनची लाँच तारीख

मोटोरोला कंपनीचा Moto G37 हा फोन पुढच्या आठवड्यात 19 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँच होणार आहे. लाँच झाल्यानंतर, हा फोन कंपनीच्या वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवरही विकला जाईल आणि फ्लिपकार्टवर या फोनसाठी एक मायक्रोसाइटसुद्धा तयार करण्यात आली आहे.

Moto G37 ची वैशिष्ट्ये

मायक्रोसाइट पाहिल्यावर असे समोर आले आहे की, या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसर, कॉर्निंग गोरिला ग्लास 7i डिस्प्ले प्रोटेक्शन, व्हर्च्युअल रॅम सपोर्ट, 6.7-इंचाचा अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले, 120 Hz रिफ्रेश रेट, 50 मेगापिक्सल क्वाड पिक्सेल टेक्नॉलॉजी, 5200 mAh बॅटरी, स्टिरिओ स्पीकर्स आणि तीन रंगांचे पर्याय असतील.

Moto G37 Power स्मार्टफोन भारतात यादिवशी होणार लाँच

हा आगामी मोटोरोला फोन पुढच्या आठवड्यात 19 मे रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर हा फोन कंपनीच्या वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Moto G37 Power स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये 7000 mAh बॅटरी, मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट, कॉर्निंग गोरिला ग्लास 7i, 50 मेगापिक्सेल क्वाड पिक्सेल टेक्नॉलॉजी, 6.7 इंच डिस्प्ले, 120 Hz रिफ्रेश रेट, 30 वॉट फास्ट चार्जिंग, 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ, व्हर्च्युअल रॅम यांसारखी खास वैशिष्ट्ये असतील.

भारतात HMD Vibe 2 5G स्मार्टफोन लाँच तारीख

हा आगामी फोन पुढच्या आठवड्यात 21 मे रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच केला जाईल. या हँडसेटसाठी फ्लिपकार्टवर एक विशेष मायक्रोसाइटदेखील तयार करण्यात आली असून, त्यावर फोनची वैशिष्ट्ये उघड करण्यात आली आहेत.

HMD Vibe 2 5G ची वैशिष्ट्ये

या आगामी स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी, 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा, तीन रंगांचे पर्याय, 18 वॉट फास्ट चार्जिंग, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, 6.7 इंच HD प्लस डिस्प्ले आणि 120 Hz रिफ्रेश रेट असेल.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी