AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Vaccine बाबत माहिती देणारं भारत सरकारचं अ‍ॅप तयार

कोरोनावरील लसीबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारने एक खास अ‍ॅप तयार केलं आहे.

Corona Vaccine बाबत माहिती देणारं भारत सरकारचं अ‍ॅप तयार
| Updated on: Nov 21, 2020 | 12:25 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर मात करण्यासाठी सगळेच देश लस निर्मितीच्या कामात गुंतले आहेत. अशात लस (Vaccine) उत्पादक कंपनी भारत बायोटेकने (Bharat Biotech) सोमवारी कोव्हिड – 19 संसर्गावर मात करणाऱ्या भारतातील पहिल्या देशी लसीची म्हणजेच ‘कोव्हॅक्सिन’ची (covaxin) तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली. फेज-3 चाचणीमध्ये संपूर्ण भारतातील 26,000 स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. याचप्रमाणे देशातील इतर ठिकाणीदेखील कोरोनावरील लस बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच कोरोनावरील लस देशात उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Get all the details about Corona Vaccine on Covin App made by Indian Government)

दरम्यान, कोरोनावरील लसीबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारत सरकारने एक खास अॅप तयार केलं आहे. कोव्हिन (Covin App) असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे अ‍ॅप तुम्हाला कोरोना लसीचा साठा, त्याचे वितरण, स्टोरेज याबाबतची माहिती देईल. ही लस जेव्हा दिली जाईल, तेव्हा त्याचे वेळापत्रकही कोव्हिन अ‍ॅपवर उपलब्ध होईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला देशभरातील 28 हजार स्टोरेज सेंटरमधील लसींच्या साठ्याविषयची माहिती मिळेल.

कोरोना व्हॅक्सिनचा साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानावरही कोव्हिन अॅपचं लक्ष असेल, या अॅपद्वारे साठा करुन ठेवलेल्या जागेवरील तापमानात होणाऱ्या बदलांबाबतची माहिती मिळेल. दरम्यान, तुम्हाला लस कधी दिली जाणार आहे, याबाबतची माहितीदेखील या अ‍ॅपद्वारे नागरिकांना मिळेल. तसेच तुम्हाला लस दिल्यानंतर त्याचं प्रमाणपत्रदेखील या अ‍ॅपद्वारे तुम्हाला दिलं जाणार. तुम्हाला लस दिल्यानंतर आपोआप या अॅपमध्ये संबंधित प्रमाणपत्र जनरेट होईल.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया दर महिन्याला कोरोना लसीचे पाच ते सहा कोटी डोस तयार करु शकते. फेब्रुवारीमध्ये ही क्षमता 10 कोटींपर्यंत वाढवली जाणार आहे. भारत सरकारला ही लस 3 ते 4 डॉलर्स म्हणजेच 225 ते 300 रुपयांमध्ये मिळेल, परंतु सामान्य नागरिकांना ही लस घेण्यासाठी 500 ते 600 रुपये मोजावे लागू शकतात.

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांच्या पार

भारतात गेल्या 24 तासांमध्ये 46 हजार 232 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे काल रात्री देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90.5 लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 46 हजार 232 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 546 बाधितांचा उपचारांरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90,50,598 इतकी झाली आहे.

देशात 4 लाख 39 हजार 747 सक्रीय रुग्ण

देशात आज सकाळपर्यंत 4 लाख 39 हजार 747 सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशात 84 लाख 78 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत देशात 13 कोटी 6 लाख 57 हजार 808 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशात 10 लाख 66 हजार 22 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20 हजारांपेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या

देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

(Get all the details about Corona Vaccine on Covin App made by Indian Government)

संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.