AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skoda Vision 7S इलेक्ट्रिकचा 30 ऑगस्टला धमाका…. जागतिक स्तरावर दाखवणार जलवा…

स्कोडाच्या अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्ही कंसेप्टमध्ये 3-रो सीट असेल. ही कार अतिशय रग्ड एक्सटिरिअर डिझाइनसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. Skoda Vision 7S इलेक्ट्रिक कारचे सीटिंग लेआउट अतिशय छान असणार आहे. सर्व-इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह सुसज्ज, इलेक्ट्रिक SUV 30 ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर पदार्पण करणार आहे.

Skoda Vision 7S इलेक्ट्रिकचा 30 ऑगस्टला धमाका…. जागतिक स्तरावर दाखवणार जलवा…
Skoda Vision 7SImage Credit source: Instagram
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 25, 2022 | 11:05 AM
Share

युरोपियन कार निर्माता कंपनी स्कोडा (Skoda) 7 सीटर एसयुव्ही (SUV) इलेक्ट्रिक कारच्या कंसेप्टवर काम करीत आहे. नुकतेच, कंपनीने अधिकृतपणे अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीचे नियोजीत स्केच देखील प्रसिद्ध केले आहे. स्कोडाच्या नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीचे नाव Skoda Vision 7S असे आहे. ही 3-रो आणि 7 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric Car) असेल. कंपनी 30 ऑगस्ट रोजी या इलेक्ट्रिक एसयुव्ही संकल्पनेचे जागतिक पदार्पण करणार आहे. आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीची रचना खूपच रग्ड आहे. स्कोडाने आपल्या आतील भागात सीटसाठी तीन रो दिल्या आहेत. नवीन स्कोडा कारमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना कारचा सभोवतालचे लाइट्‌स आपोआप चालू होतात. या नवीन कारमध्ये अजून काय खास आहे, याची माहिती या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.

1) स्कोडा विजन 7S संकल्पनेचा पुढचा भाग Enyaq पेक्षाही अधिक रग्ड आहे.

2) आगामी इलेक्ट्रिक एसयूव्हीला दोन चौरस बल्बमध्ये विभागलेला टी-आकाराचा हेडलाइट मिळतो.

3) या कारमध्ये बॉनेट शट-लाइन आणि रंग-कॉन्ट्रास्टिंग ग्रिल एरियासह भुवयासारखे DRLs देखील मिळतात.

4) स्कोडा विजन 7S चे ग्रिल क्षेत्र Enyaq पेक्षा लहान आहे. कॉन्सेप्ट कारमध्ये रियर व्ह्यू कॅमेरा देखील आहे.

5) स्कोडाच्या नवीन इलेक्ट्रिक कारला सर्वत्र वळवता येणारा बेल्टलाइन मिळतो.

6) कारच्या मागील बाजूस असलेला स्पॉयलर तिला स्पोर्टियर कारचा लूक देतो.

7) 30 ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर पदार्पण करणाऱ्या कंसेप्टमध्ये लो-प्रोफाइल व्हील्स आहेत.

8) नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये सहा अडल्ट आणि एका मुलासाठी जागा आहेत. कारच्या मध्यवर्ती कन्सोलमध्ये चाइल्ड सीट जोडण्यात आले आहे.

9) चाइल्ड सीट पार्ट हा कारचा सर्वात मजबूत भाग असल्याचा दावा स्कोडाने केला आहे

10) हॅप्टिक कंट्रोलअंतर्गत स्टीयरिंग व्हील, डोअर पॅनल आणि व्हर्टीकल स्क्रीनसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?