AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Chrome Alert | गुगल क्रोमचे हे व्हर्जन वापरताय? मग लगेचच अपडेट करा, सरकारने का दिला धोक्याचा इशारा 

Google Chrome Alert | गुगल क्रोम ब्राऊझिंग किती सुरक्षित आहे, आपण बिनधास्त गुगल करतो. पण त्याच्या धोक्याचा कधीही विचार करत नाही. आता केंद्र सरकारने नागरिकांना गुगल क्रोम ब्राऊझिंगविषयी अलर्ट दिला आहे. सायबर सुरक्षा संस्था, कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमला त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत.

Google Chrome Alert | गुगल क्रोमचे हे व्हर्जन वापरताय? मग लगेचच अपडेट करा, सरकारने का दिला धोक्याचा इशारा 
| Updated on: Feb 25, 2024 | 9:20 AM
Share

नवी दिल्ली | 25 February 2024 : आपल्या मनात शंका असेल, काही प्रश्नाची उत्तरे शोधायची असतील, काही माहिती मिळवायची असेल तर आपण थेट गुगलवर सर्च करतो. गुगल करण्याची ही पद्धत आता आपल्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. तुम्ही कंम्प्युटर, लॅपटॉप अथवा मोबाईलचा वापर करत असाल तर गुगल क्रोम बाऊझरचा वापर करतो. पण ब्राऊझर किती सुरक्षित आहे? कारण आता याविषयी केंद्र सरकारने युझर्सला अलर्ट दिला आहे.

आढळल्या त्रुटी

केंद्र सरकारची सायबर सिक्युरिटी एजन्सी कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने याविषयी युझर्सला अलर्ट केले आहे. या ब्राऊझरमध्ये काही त्रुटी आहेत. त्याचा हॅकर्स फायदा घेत असल्याचे समोर आले आहे. युझर्सचा खासगी डेटा चोरुन त्याआधारे फसवणूक होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सायबर गुन्हेगार तुमच्या खासगी माहिती आधारे सिस्टिम हॅक करु शकता. त्यामुळे गुगल क्रोम ब्राऊझर वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.

हे व्हर्जन धोकादायक

कम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने याविषयीची सूचना दिली आहे. त्यानुसार, गुगल क्रोममध्ये अशा काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्याच्या मदतीने गुन्हेगार आणि हँकर्सला मदत होऊ शकते. या त्रुटीच्या माध्यमातून हॅकर्स तुमचे कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल सहज एसेस मिळवू शकता. ते हॅक करु शकतात. क्रोमचे v122.0.6261.57 वा त्यापेक्षा जुने व्हर्जन सर्वाधिक धोकादायक आहे.

गुगल पण लागले की कामाला

केंद्र सरकारच्या या इशाऱ्यानंतर गुगल पण कामाला लागले आहे. क्रोमसंबंधी सुरक्षेत सुधारणेसाठी कंपनीने प्रयत्न सुरु केले आहेत. क्रोमच्या ब्राऊझिंगवेळी ज्या त्रुटी समोर आणल्या. त्यावर काम सुरु आहे. गुगलने युझर्सला सांगितले आहे की, सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी युझर्संनी गुगलचे ब्राऊझर अपडेट करणे गरजेचे आहे. नवीन व्हर्जन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

असे करा ब्राऊझर अपडेट

  • 1. सर्वात अगोदर कम्प्युटरवर गुगल क्रोम ब्राऊझर उघडा
  • 2. स्क्रीनच्या सर्वात उजव्या बाजूला 3 डॉट्स वर क्लिक करा
  • 3. आता मुख्य मेनू दिसेल. त्यामध्ये मदतीच्या पर्यायावर क्लिक करा
  • 4. त्यामध्ये अबाऊट गुगल क्रोम हा पर्याय निवडा
  • 5. त्यावर क्लिक करताच क्रोम अपडेट होईल. त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल
  • 6. अपडेट पूर्ण झाल्यावर क्रोम ब्राऊझर रिलाँच करा

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी