AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जूनपासून अमेरिकेत google pay बंद होणार, काय आहे कारण जाणून घ्या

Google pay : भारतात डिजीटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहेत. करोडो लोकं भारतात आता गुगल पे हे अॅप वापरतात. गुगल पे च्या माध्यमातून लोकं सहज पैसे पाठवतात. पण आता गुगल पे हे बंद होणार आहे. कंपनीने असा निर्णय का घेतला आणि काय आहे कारण जाणून घ्या.

जूनपासून अमेरिकेत google pay बंद होणार, काय आहे कारण जाणून घ्या
| Updated on: Feb 24, 2024 | 6:11 PM
Share

Gpay App Update : भारतात आता गुगल पे हे करोडो लोकं वापरत आहेत. अनेकांना १० रुपये जरी द्यायचे असतील तरी ते लोकं गुगल पेचा वापर करतात. त्यामुळे भारतात डिजीटल पेमेंट करण्यांऱ्याची संख्या झपाट्याने वाढली आहे. जगातील सर्वात जास्त डिजीटल पेमेंट हे भारतात केले जात आहेत. त्यामुळेच गुगल पे आणि इतर डिजीटल कंपन्यांचे महत्त्व वाढले आहे. पण असं असतानाच एका देशात मात्र गुगल पे बंद होणार आहे. कोणता आहे तो देश आणि का होतंय त्या देशात गुगल पे बंद जाणून घ्या.

गुगल पे अॅप बंद होणार

Google ने घोषणा केली आहे की ते 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये Google Pay ॲप बंद करत आहे. Google Wallet प्लॅटफॉर्मवर त्यांना आता Google ची पेमेंट ऑफर आणायची आहे. म्हणजेच आता गुगल पेचे जुने व्हर्जन बंद होणार आहे. हे ॲप बंद केल्याने पीअर-टू-पीअर पेमेंटही बंद होणार आहे. याआधी फक्त त्याच्या मदतीने अमेरिकेत पैसे पाठवू किंवा मागवू शकत होते. अमेरिकेतील लोकं ते अधिक वापरत होते. त्यामुळे तुम्हाला जर अमेरिकेत कोणाला पैसे पाठवायचे किंवा मागवायचे असतील तर ते शक्य होणार नाहीये.

भारत आणि सिंगापूर सुरु राहणार

कंपनीने एका ब्लॉग पोस्टद्वारे माहिती दिली आहे की Google Pay ॲपचा अनुभव आणखी सुलभ करण्यासाठी, स्टँडअलोन Google Pay ॲपची यूएस आवृत्ती 4 जून 2024 पासून वापरासाठी उपलब्ध होणार नाही. Google Pay ॲप युनायटेड स्टेट्समध्ये बंद केले जाईल, परंतु Google Pay ॲप भारत आणि सिंगापूर सारख्या इतर बाजारपेठांमध्ये सुरळीतपणे चालू राहील.

गुगलने ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, भारत आणि सिंगापूरमध्ये गुगल पे ॲप वापरणाऱ्या लाखो लोकांमध्ये काहीही बदल होणार नाही. गुगल पे बंद झाल्यानंतर यूएसमधील युजर्सला येणारा एक बदल म्हणजे युजर यापुढे Google Pay ॲपद्वारे इतर व्यक्तींना पैसे पाठवू किंवा प्राप्त करू शकत नाहीत.

कंपनी Google Pay युजर्सला Google Wallet ॲपवर जाण्याचा सल्ला देत आहे. यात व्हर्च्युअल डेबिट सारखी वैशिष्ट्ये आहेत. युजर त्यांच्या खात्यात राहिलेले पैसे पाहू शकतील आणि बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा Google Pay वेबसाइटद्वारे उपलब्ध असेल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.