कसा असेल Google Pixel 10 Pro,जाणून घ्या कॅमेऱ्यापासून फीचर्सपर्यंत सर्वकाही…
गुगल लवकरच त्यांचे नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 10 Pro आणि Pixel 10 Pro XL भारतीय बाजार पेठेत आणण्याच्या तयारीत आहे. येणाऱ्या मालिकेत कोणते फीचर्स, कॅमेरा आणि बॅटरी किती शक्तिशाली असेल याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊयात...
तुम्ही जर गुगलच्या पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोनची वाट पाहत असाल तर स्मार्टफोन प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण नवीन लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये गुगलचे Pixel 10 Pro आणि Pixel 10 Pro XL या फोनच्या सीरिजबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की ही स्मार्टफोन सीरीज ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय बाजरपेठेत लाँच केली जाऊ शकते. या सीरीजमध्ये काय खास असेल, पिक्सेल 10 प्रो सीरीजमध्ये कॅमेरा आणि बॅटरी कशी असेल, याबद्दलचे सर्व माहिती आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत…
गुगल पिक्सेल 10 प्रो सीरीजची पॉवरफूल कामगिरी
गुगलचे हे स्मार्टफोन टेन्सर G5 चिपसेट येणाऱ्या सीरीज मिळू शकतो, जो आधीच्या सीरीजपेक्षा वेगवान आणि अधिक पॉवरफूल असेल. यात 16 GB जीबी पर्यंत रॅम दिली जाऊ शकते. स्टोरेजसाठी अनेक पर्याय असतील.Pixel 10 Pro मध्ये 128 GB जीबी, 256 GB जीबी, 512 GB जीबी आणि 1GB टीबी स्टोरेज पर्याय असू शकतात. Pixel 10 Pro XLफोनमधील स्टोरेज पर्याय 256 GBजीबीपासून सुरू होतील.
उत्तम डिस्प्ले
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्स पीक ब्राइटनेससह LTPO OLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. Pixel 10 Pro मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असू शकतो, Pixel 10 Pro XL मध्ये6.8 -इंचाचा डिस्प्ले असू शकतो.
कॅमेरा देखील पॉवरफूल असेल
गुगल यावेळीही त्यांचा नवीन सीरीज असलेल्या स्मार्टफोनमध्ये सर्वोत्तम कॅमेरा सेटअप कायम ठेवणार आहे. फोटो-व्हिडिओग्राफीसाठी, तुम्हाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 48-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 5x झूमसह 48-मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स दिले जात आहे. या कॅमेऱ्यांसह, तुम्ही मॅक्रो फोटोग्राफी देखील करू शकाल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 42-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिसू शकतो. तसेच यात तुम्हाला उच्च दर्जाचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.
बॅटरी आणि चार्जिंग
Pixel 10 Pro मध्ये 4,870 mAH बॅटरी असू शकते. याशिवाय Pixel 10 Pro XL मध्ये 5,200 mAH बॅटरी असू शकते. जर असे झाले तर ही आतापर्यंतची ही सर्वात मोठी पिक्सेल बॅटरी असेल.
चार्जिंगबद्दल बोलायचे झाले तर, Pixel 10 Pro मध्ये 29W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. तर Pixel 10 Pro XL मध्ये तुम्हाला 39W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.
प्रीमियम डिझाइन, पॉवरफुल कामगिरी आणि उत्कृष्ट कॅमेरासह सर्वोत्तम अँड्रॉइड अनुभव हवा असलेल्यांसाठी पिक्सेल १० प्रो मालिका उत्तम ठरू शकते.
