Google का देत आहे 8500 रुपये? कोणा-कोणाला मिळणार हे पैसे?
गूगलचा Pixel 6a चालवणाऱ्या सर्व यूजर्सला कंपनीच्या ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागणार आहे. त्या ठिकाणी जाऊन बॅटरी बदलून घेता येईल. तसेच ज्या लोकांना बॅटरी बदलून घ्यायची नाही त्यांना 100 जवळपास 8500 रुपये मिळणार आहे.

Google Pixel 6a चलवणाऱ्या यूजर्सला कंपनी 8500 रुपये देणार आहे. हे पैसे गूगल युजरला का देणार आहे? त्याचे उत्तर अनेकांना माहीत नाही. अनेकांना त्याचे उत्तर हवे आहे. कंपनी Google Pixel 6a वापरणाऱ्या यूजरला पैसे देणार आहे. हा फोन वापरणाऱ्या यूजरकडून ओव्हरहिटींग आणि बॅटरीची कार्यक्षमता यासंदर्भात तक्रारी मिळत आहे. या तक्रारीमुळे गूगलने बॅटरी परफॉर्मंस प्रोग्राम सुरु करत आहे. या प्रोग्रामनुसार कंपनी मोफत बॅटरी बदलून देणार किंवा भरपाई म्हणून 100 डॉलर (जवळपास 8500 रुपये) देणार आहे. कंपनी 8 जुलै रोजी पिक्सल 6ए ची बॅटरी परफॉर्मेंस सुधारणे आणि ओव्हरहीटींग कमी करण्यासाठी एंड्रॉयड 16 अपडेटलाही रोलआउट करणार आहे.
कोणाला मिळणार पैसे?
Pixel 6a चालवणाऱ्या सर्व यूजर्सला कंपनीच्या ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागणार आहे. त्या ठिकाणी जाऊन बॅटरी बदलून घेता येईल. तसेच ज्या लोकांना बॅटरी बदलून घ्यायची नाही त्यांना 100 डॉलर (जवळपास 8500 रुपये) किंवा 150 डॉलरचा (जवळपास 12800 रुपये) गूगल स्टोर क्रेडिट ऑप्शन पर्याय निवडावा लागणार आहे.
बॅटरी परफॉर्मेंस प्रोग्रोमसाठी तुम्ही एलिजिबल आहात किंवा नाही ते तपासण्यासाठी कंपनीच्या सपोर्ट पानावर जा. त्याठिकाणी फोनचा IMEI नंबर टाकल्यावर ईमेल टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्याबाबत माहिती मिळणार आहे. गूगल रेगुलेशनमुळे सर्व देशांत कॅश पेमेंट पर्याय उपलब्ध नाही. पेमेंट्स कंपनी थर्ड पार्टी Payoneer च्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी यूजरला आयडी प्रूफ आणि पॅन कार्ड द्यावे लागणार आहे.
कुठे सुविधा मिळणार
गूगलने स्पष्ट केले आहे की, लिक्विड डॅमेज किंवा फिजिकल डॅमेज असणारे फोन मोफत बॅटरी सर्व्हिस कार्यक्रमासाठी पात्र असणार नाही. तसेच फोन वारंटीमध्ये नाही आणि त्याची स्क्रीन तुटली असेल तर कंपनी तुमच्याकडून सर्व्हिस चार्ज घेणार आहे. गूगलची बॅटरी रिप्लेसमेंट सुविधा 21 जुलै 2025 पासून कॅनडा, अमेरिका, जर्मनी, यूनायटेड किंगडम (यूके), जपान, सिंगापूर आणि भारतातील वॉक-इन रिपेयर सेंटरवर उपलब्ध आहे.
