AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI फीचर्ससह मैदानात उतरला Google Pixel 8a; किंमत तर केवळ इतकी

AI Features Smartphone : गुगल स्मार्टफोन तुम्हाला आवडत असेल, तर ही अपडेट तुमच्यासाठीच आहे. कंपनीने Pixel A नावाने नवीन स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. Pixel 8a या नवीन फोनमध्ये गुगलने एआय फीचर्स दिले आहेत. किती आहे या फोनची किंमत?

AI फीचर्ससह मैदानात उतरला Google Pixel 8a; किंमत तर केवळ इतकी
गुगलचा नवीन दमदार फोन
| Updated on: May 08, 2024 | 3:21 PM
Share

Google Pixel A मालिकेत आता ग्राहकांना एक नवीन स्मार्टफोन मिळाला आहे. या पिक्सल स्मार्टफोन नाव Google Pixel 8a असे आहे. पिक्सलच्या या नवीन मालिकेत किफायतशीर किंमतीत पिक्सल डिव्हाईस उतरण्यात येतात. गेल्या वर्षी मे महिन्यात Pixel 7a चे अपग्रेड मॉडेल पिक्सल 8ए मध्ये अनेक जोरदार फीचर्स आले आहेत. कोणत्याही लाँचिंग इव्हेंटशिवाय गुगलने नवीन Pixel Smartphone बाजारात उतरवला हे विशेष…

इव्हेंटपूर्वीच स्मार्टफोन बाजारात

गुगल पिक्सल ए सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन Google I/O या इव्हेंटमध्ये सादर करण्यात येतात. यावर्षी Google I/O 2024 हा इव्हेंट 14 मे पासून धडाक्यात सुरु होत आहे. पण हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच पिक्सल ए मालिका बाजारात उतरवून गुगलने सगळ्यांना बुचकळ्यात टाकले आहे. या स्मार्टफोनमध्ये 7 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर सपोर्ट मिळेल.

Google Pixel 8a Pre Booking Details

गूगल पिक्सल 8ए ची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन फ्लॅगशिप फीचर्ससह उतरविण्यात आला आहे. या फोनची विक्री पुढील आठवड्यात 14 मे रोजी सकाळी 6:30 वाजता सुरु करण्यात येणार आहे. तुम्हाला या फोनसाठी आता बुकिंग करता येईल. ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Flipkart वर प्री-बुकिंग सुरु झाली आहे.

Google Pixel 8a Price in India

या गुगल पिक्सल स्मार्टफोनचा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 52 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. 256 जीबी स्टोरेजचा हँडसेट खरेदीसाठी ग्राहकांना 59,999 रुपये खर्च करावे लागतील. ग्राहकांना बुकिंग करताना सूट पण मिळणार आहे. काही बँक कार्ड्स पेमेंटवर 4 हजार रुपयांचा कॅशबॅक आणि 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआई सुविधा देण्यात आली आहे.

Google Pixel 8a Specifications

डिस्प्ले : फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.1 इंचची फुल-एचडी प्लस डिस्प्ले

प्रोसेसर : फोनमध्ये गुगल टेंसर जी3 चिपसेटसह सुरक्षेसाठी Titan M2 चिपचा वापर

कॅमेरा सेटअप : फोनच्या मागील भागात 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. समोरील भागात 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेन्सर

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.