AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखो लोकांना फटका बसणार, Google ‘ही’ खास सेवा बंद करणार

गुगल लवकरच एक खास सेवा बंद करणार आहे. त्यामुळे जगभरातील युजर्सना मोठा फटका बसणार आहे. गुगल या वर्षाच्या अखेरीस ही सेवा बंद करणार आहे.

लाखो लोकांना फटका बसणार, Google 'ही' खास सेवा बंद करणार
Google
| Updated on: Aug 10, 2025 | 5:17 PM
Share

जगभरातील कोट्यवधी लोक गुगलचा वापर करतात. मात्र आता गुगल लवकरच एक खास सेवा बंद करणार आहे. त्यामुळे जगभरातील युजर्सना मोठा फटका बसणार आहे. गुगल या वर्षाच्या अखेरीस ही सेवा बंद करणार आहे. त्यामुळे गेमिंग युजर्सना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गुगल आता क्रोमबुक बीटासाठी स्टीमला सपोर्ट करणे बंद करणार आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे, युजर्स स्टीमद्वारे क्रोमबुकवर गेम खेळू शकणार नाहीत. ही सेवा का बंद केली जाणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

1 जानेवारी 2026 पासून सेवा बंद होणार

9टू5 गुगलच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. यानुसार, गुगलने यासाठी क्रोमबुक युजर्सना एक मेसेज पाठवला आहे. यात युजर्सना सांगण्यात आले आहे की, ते आगामी काळात स्टीमद्वारे गेम खेळू शकणार नाहीत. 1 जानेवारी 2026 पासून ते स्टीम लाँच करू शकणार नाहीत. मात्र हे बीटा अॅप 31 डिसेंबर 2025 पर्यंत कामकणार आहे. त्यानंतर ते बंद होणार आहे.

स्टीम काय आहे?

स्टीम हा एक पीसी गेमिंग प्लॅटफॉर्म आहे, याद्वारे तुम्ही पीसीवर गेम डाउनलोड करू शकता. तसेच याद्वारे काही गेम भाड्याने देखील घेता येतात. यासाठी तुम्हाला तुमच्या पीसीवर स्टीम अॅप डाउनलोड करावे लागते. 2022 मध्ये, गुगलने स्टीमच्या सहकार्याने क्रोमबुक युजर्ससाठी याचे बीटा व्हर्जन आणले होते, मात्र आता ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच काम करणार आहे, त्यानंतर ते बंद होईल.

हा आहे नवा पर्याय

गुगल क्रोमबुकमध्ये स्टीमद्वारे 99 वेगवेगळे गेमिंग टायटल खेळता येता. हे या ऑपरेटिंग सिस्टमशी सुसंगत आहे. मात्र आता युजर्स 1 जानेवारीपासून अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर हे गेम खेळू शकणार आहेत. आता युजर्सना स्टीमऐवजी गुगल प्ले स्टोअरवरून गेम डाउनलोड करावा लागणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर काही गेम डाऊनलोड करण्यासाठी पैसेही मोजावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गेम खेळणाऱ्या युजर्सना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.