AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनोळखी रस्ते आता स्वत:च शोधा, GPS बंद होण्याच्या मार्गावर

मुंबई : ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच GPS शिवाय आज आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करु शकत नाही. रेल्वेची माहिती असो किंवा गुगल मॅपचा वापर, GPS आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. जर हेच GPS सिस्टीम बंद पडलं तर, आपण याचा विचारही करु शकत नाही. पण, येत्या 6 एप्रिलपासून GPS बंद होऊ शकतं. असं होऊ नये यासाठी संपूर्ण […]

अनोळखी रस्ते आता स्वत:च शोधा, GPS बंद होण्याच्या मार्गावर
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

मुंबई : ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच GPS शिवाय आज आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करु शकत नाही. रेल्वेची माहिती असो किंवा गुगल मॅपचा वापर, GPS आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. जर हेच GPS सिस्टीम बंद पडलं तर, आपण याचा विचारही करु शकत नाही. पण, येत्या 6 एप्रिलपासून GPS बंद होऊ शकतं. असं होऊ नये यासाठी संपूर्ण जगातील टेक्नोलॉजी एक्सपर्ट आणि नेटवर्क ऑपरेटर्स या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

ईएएसए सेफ्टी इन्फॉरमेशन बुलेटीननुसार, 6 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून GPS रिसीव्हरवर नॅव्हिगेशन डेटा चुकिचा येईल. यासाठी GPS च्या वीक नंबर (आठवड्याचा क्रमांक) रोलओव्हर इव्हेंटला रिसेट करावं लागतं. जर 6 एप्रिलपर्यंत GPS डेटा रिसीव्हरला रिसेट केलं गेलं नाही, तर नॅव्हिगेशन सोल्यूशसाठी ज्या टाईम डेटाचा वापर केला जातो, तो बदलून जाईल. GPS च्या वेळेत एका नॅनो सेकंदाचा बदलही GPS डेटामध्ये एक फुटाच्या बरोबरीचा होऊ शकतो, असे ईएएसएने सांगितलं.

GPS च्या वीकली नंबरची मर्यादा ही शून्य ते 1023 आठवड्यांची आहे. जी मर्यादा आधीच पार झाली आहे. 6 एप्रिल 2019 पासून याचा 2014 वा आठवडा सुरु होणार आहे. त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. 6 एप्रिलपासून GPS सिस्टीमचा पहिला आठवडा सुरु होईल. म्हणजेच जेव्हा GPS मध्ये पहिल्यांदा वेळ आणि काळ टाकण्यात आला असेल, तेव्हापासून पुन्हा ते चक्र सुरु होईल. 6 एप्रिल 2019 ला GPS 21 ऑगस्ट 1999 समजेल आणि त्यानुसार काम करेल. 21 ऑगस्ट 1999 लाच GPS रोलओव्हर करण्यात आलं होतं. GPS मध्ये ही समस्या 21 ऑगस्ट 1999 लाही उद्भवली होती. तेव्हा GPS चा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर होत नव्हता. पण, जर ही समस्या आज उद्भवली तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. कारण, आज उद्योग-धंद्यांमध्ये, सरकार आणि सामान्य लोकही मोठ्या प्रमाणावर GPS चा वापर करतात.

जगभरातील जानकार आणि टेक्नोलॉजी एक्सपर्ट या समस्येवर उपाय शोधत आहेत. ही समस्या खूप मोठी आहे, यामुळे संपूर्ण जगातील GPS सिस्टमवर याचा परिणाम होईल. कारण, आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन आहेत. ज्यावर आपण रस्ता शोधण्यासाठी, आपलं लोकेशन शेअर करण्यासाठी, टॅक्सी बुक करण्यासाठी इत्यादी कामांसाठी GPS चा वापर करतो. तसेच GPS मुळे गुन्हेगारीवर रोख लावण्यातही बरीच मदत होते. त्यासोबतच वेगवेळ्या उद्योगांतही GPS चा वापर केला जातो. त्यामुळे जर GPS सेवा ठप्प झाली किंवा त्यात काही बिघाड आला तर जगभरातील लोकांना याचा त्रास होणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.