AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगल सर्चसाठी मोजावे लागतील दाम? कंपनीचा दावा तरी काय

Google Search : आतापर्यंत गुगल सर्च तुम्ही मोफत वापरत आला आहात. पण आता कंपनी काही योजना तयार करण्याच्या विचारात आहे. गुगल सर्चचे काही फीचर्स पेड युझर्ससाठी सुरु करण्याची कंपनीची योजना आहे. अजून कंपनीने याविषयीचा निर्णय घेतलेला नाही, जाणून घ्या प्रकरण तरी काय ...

गुगल सर्चसाठी मोजावे लागतील दाम? कंपनीचा दावा तरी काय
गुगल सर्चसाठी मोजावे लागतील दाम?
| Updated on: Apr 05, 2024 | 3:37 PM
Share

Google मोठ्या तयारीत आहे. कंपनीचा सर्च हा पर्याय, सेवा सध्या मोफत आहे. याच माध्यमातून कंपनीची मोठी कमाई होते. अर्थात कंपनी या पॉलिसीत, धोरणात मोठा बदल करण्याच्या विचारात आहे. कंपनी प्रीमियम फीचर्स सशुल्क करण्याच्या विचारात आहे. म्हणजे त्या सेवांसाठी तुम्हाला पैसा मोजावा लागेल. प्रीमियम फीचर्स म्हणजे जनरेटिव्ह AI च्या माध्यमातून येणारे निकाल, त्याआधारे युझर्सला फायदा घेता येईल, अशा सर्च पर्यायासाठी यापुढे पैसा मोजावा लागणार आहे. अर्थात याविषयीची अधिकृत भूमिका गुगलने अद्याप जाहीर केलेली नाही.

AI स्नॅपशॉच फीचर

गुगलने काही दिवसांपूर्वी गुगल सर्चसाठी जनरेटिव्ह AI स्नॅपशॉच फीचर एक्सपेरिमेंटल लाँच केले. या फीचरच्या मदतीने युझर्सला सर्च करण्यात आलेल्या विषयाविषयी AI सर्च माध्यमातून माहिती मिळते. एआय सर्च माध्यमातून ज्या विषयांचा धांडोळा घेण्यात आला. त्याची एक समरी युझर्सला पाहायला मिळते. अर्थात कंपनी त्यात बदल करु इच्छिते. Financial Times ने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. गुगल जर बदल करत असेल तर कंपनी सर्च इंजिनसाठी पेमेंट वा शुल्क आकारण्याची शक्यता या वृत्तात नोंदवली आहे.

ChatGPT ने बिघडवला खेळ

  1. गुगल सर्च मुळे कंपनीची मोठी कमाई झाली असती. पण ChatGPT आल्यामुळे कंपनीला व्यवसायावर परिणाम दिसत आहे. प्लॅटफॉर्म लाँच होऊन जवळपास दीड वर्ष उलटले. आता कंपनी एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. एआयच्या माध्यमातून कमाई करण्यावर कंपनी भर देण्याची शक्यता आहे.
  2. गुगलने सर्च आणि सर्चसंबंधी जाहिरातींच्या मदतीने गेल्या वर्षी 175 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कमाईच्या निम्मे असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच कंपनी सर्चच्या माध्यमातून येणारा पैसा बचत करण्याच्या विरचारात आहे. चॅटजीपीटीमुळे कंपनीसमोर एक मोठे आव्हान उभं ठाकले आहे.
  3. ChatGPT अत्यंत कमी वेळेत योग्य आणि झटपट उत्तर देते. त्यामुळे अनेकजण गुगल सर्चचा वापर करणे कमी करण्याची शक्यता आहे. कंपनीला हीच मोठी भीती आहे. गुगलने गेल्या वर्षी मे महिन्यात एआय पॉवर्ड सर्च इंजिनवर काम करणे सुरु केले होते. अर्थात गुगल या प्रायोगिक फीचरला मुख्य सर्च इंजिनशी जोडण्याची शक्यता कमी आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.