जाणून घ्या घरातील एसीचा गॅस संपल्याचे हे पाच संकेत

कूलिंग कमी होणे हे गॅस गळती किंवा गॅस कमी होण्याचे सर्वात महत्वाचे संकेत मानले जाते. (Here are five indications to know Did the AC in the house run out of gas)

जाणून घ्या घरातील एसीचा गॅस संपल्याचे हे पाच संकेत
सामान्य एसीपेक्षा इन्व्हर्टर एसीला ग्राहकांची अधिक पसंती

नवी दिल्ली : जर आपण घरी एसी वापरत असाल तर आपल्याला एसीची निगा कशी राखायची हे माहितच असेल. सर्व्हिसिंग करणे किंवा वेळोवेळी एसीचा गॅस तपासणे हे करावे लागते. मात्र आपल्याला एसीचा गॅस संपत आला आहे हे कसे ओळखायचे याबाबत माहित आहे का? पाच बाबींचे निरीक्षण केल्यास आपल्याला गॅस संपला का हे तपासता येते. या संकेताच्या आधारे आपण सहजपणे माहित करु शकता की आपल्या एसीमध्ये गॅस भरण्याची किंवा गॅस गळती शोधण्याची आवश्यकता आहे. (Here are five indications to know Did the AC in the house run out of gas)

एसी थंड होत नाही

अपेक्षेप्रमाणे एसी थंड न होणे हे एसीचा गॅस संपल्याचा पहिला संकेत आहे. एसीचा गारवा आधीपासूनच कमी होणे किंवा ती कूलिंग बंद होणे अशी परिस्थिती असल्यास आपण समजून जावे की आपल्या एसीमधील गॅस कमी झाला असेल. कूलिंग कमी होणे हे गॅस गळती किंवा गॅस कमी होण्याचे सर्वात महत्वाचे संकेत मानले जाते.

बर्फ जमण्यास सुरवात होते

थंडावा कमी होण्यासोबत जर आपल्या एसीच्या एवापोरेटरवर बर्फ जमा होत असेल तर समजावे की आपल्या एसीमधील गॅस कमी होत आहे की गळती होत आहे. अशा परिस्थितीत आपण पाहू शकता की एसीच्या एवापोरेटरवर बर्फाच्या एक किंवा दोन लाईनमध्ये बर्फ जमते. यावरुन आपण समजू शकता की गॅस गळत आहे. हे इनडोअर कूलिंग करते आणि गॅस गळतीचे महत्त्वपूर्ण संकेत आहे.

एसीमधून आवाज येणे

जर आपल्या एसीमधून बुडबुड आवाज येत असेल, तर समजू शकता की गॅस गळती होत आहे. याशिवाय जेव्हा टायरमधून हवा बाहेर येते, तेव्हा त्यातून जो आवाज निघतो, तसा आवाज एसीमधून येत असेल तर आपण अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ गॅस गळती सुरूच आहे.

खोलीतील आर्द्रता

एसीचे काम आर्द्रता कमी करणे आहे आणि म्हणूनच लोकांना एसी जास्त आवडते. वास्तविक, जेव्हा एसी प्रॉपर रेफ्रिजेट करण्यास सक्षम नसते तेव्हा आर्द्रता कमी कमी करु शकत नाही आणि हे कमी गॅसमुळे होते. अशा परिस्थितीत खोलीत आर्द्रता आहे आणि एसी लावल्यानंतर कमी होत नसेल तर आपण एसीचा गॅस तपासून घ्यावा.

कंप्रेसरद्वारे करु शकता चेक

या व्यतिरिक्त आपण कॉम्प्रेसरद्वारे गॅस कमी झाला आहे का हे तपासू शकता. कॉम्प्रेसर तापमान राखण्यासाठी कार्य करते आणि चालू-बंद होत राहते. जर आपल्याला असे वाटत असेल की कंप्रेसर बंद होण्यास जास्त वेळ घेत आहे, तर आपल्या एसीमध्ये गॅसची कमतरता असल्याचे समजेल. वास्तविक, कमी गॅसमुळे कंप्रेसर बंद होण्याचा काळ वाढतो आणि तो बराच काळ चालतो. (Here are five indications to know Did the AC in the house run out of gas)

इतर बातम्या

दरवर्षी खात्यात येणार 1 लाख रुपये, LIC ची जबरदस्त योजना

अवघ्या 7.95 लाखात खरेदी करा Mahindra ची शानदार SUV, फीचर्सच्या बाबतीत अव्वल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI