James Webb Telescope: अंतराळात कसा दिसतो ताऱ्याचा मृत्यू? जेम्स वेब टेलिस्कोपने पहिल्यांदा दाखवले अद्भुत, नासाच्या दुर्बिणीने पुन्हा जिंकली सगळ्यांची मने

या दुर्बिणीच्या इन्फ्रारेडमधून हे अंतराळातील अद्भुत फूटेज रेकॉर्ड करण्यासाठी दोन कॅमेरांचा वापर करण्यात येतो. जेम्स वेब जमा करत असलेली माहिती आणि व्हिडीओचा संशोधकांसाठी फार मोठा उपयोग होणार आहे. हा दुर्बिणीच्या मदतीने खगोलप्रेमी असे नेबुला अधिक सूक्ष्मतेने पाहू शकणार आहेत, अशी माहिती नासाच्या विशेषज्ञांनी दिली आहे.

James Webb Telescope: अंतराळात कसा दिसतो ताऱ्याचा मृत्यू? जेम्स वेब टेलिस्कोपने पहिल्यांदा दाखवले अद्भुत, नासाच्या दुर्बिणीने पुन्हा जिंकली सगळ्यांची मने
एका ताऱ्याचा मृत्यूImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 9:55 PM

वॉशिंग्टन – ब्रह्मांड (Universe)अनंत आहे. केवळ भौतिक दृष्ट्याच नाही तर आपल्या कल्पनेतही या ब्रह्मांडाचा थांग लागणे अवघड आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याच ब्रह्मांडातील, अंतराळातील सर्वात दूरवर काय सुरु आहे हे आपल्याला पाहायला मिळालं. नासाच्या जेम्स वेब (James web telescope)या दुर्बिणीच्या इन्फ्रारेड कॅमेर हे दृष्य कैद झालं होतं. याच काळात याच जेन्स वेब दुर्बिणीने एक अतुलनीय व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. याच मरत असलेल्या ताऱ्याचे (Death of star)अखेरचे क्षण आपल्या डोळ्यांना पाहता येत आहेत. नासाने या क्षणाचा फोटो शेअर करत लिहिले आहे की जेम्स वेबने आम्हाला एक अंगठी दिली आहे. जेम्स वेबच्या व्हिडिओत साउदर्न रिंग प्लॅनेटरी नेबुला दिसत आहे. नासाने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये हे व्यवस्थित समजावून सांगितले आहे. त्यांनी लिहिले आहे की, प्लॅनेटरी नेबुला हे मरणाऱ्या ताऱ्यातून निघणाऱ्या वायू आणि धुळाचे लोट असतात. नेबुला म्हणजे सौरमंडळाच्या पलिकडे दिसणारी ढगासारखी आकाशगंगा. पृथ्वीपासून २५०० प्रकाश वर्ष दूर असलेल्या साउदर्न रिंग प्लॅनेटरी नेबुला हे आत्तापर्यंत खगोलशास्त्रज्ञांपासून लपून बसलेले होते. मात्र आता जेम्स वेब दुर्बिणीच्या मदतीने खगोलशास्त्रज्ञ नेबुलाच्या केंद्रातील एका मरणाऱ्या ताऱ्याची बारकाईने माहिती घेऊ शकत आहेत.

View this post on Instagram

A post shared by NASA (@nasa)

आता नेबुलातील आतली रहस्येही उलगडणार

या दुर्बिणीच्या इन्फ्रारेडमधून हे अंतराळातील अद्भुत फूटेज रेकॉर्ड करण्यासाठी दोन कॅमेरांचा वापर करण्यात येतो. जेम्स वेब जमा करत असलेली माहिती आणि व्हिडीओचा संशोधकांसाठी फार मोठा उपयोग होणार आहे. हा दुर्बिणीच्या मदतीने खगोलप्रेमी असे नेबुला अधिक सूक्ष्मतेने पाहू शकणार आहेत, अशी माहिती नासाच्या विशेषज्ञांनी दिली आहे. नुकतेच या दुर्बिणीने सर्वात जुनम्या आकाशगंगेचे आणि स्पायरल गॅलेक्सीचे फोटोही जारी केले आहेत.

आकाशगंगा फिरताना दिसू शकते

स्पायरल गॅलेक्सी ही भ्रमण करणाऱ्या आकाशगंगेचे अत्यंत चांगले उदाहरण आहे. जेम्स वेबने इन्फ्रारेड कॅमेरांचा वापर करत अत्यंत दूर अंतरावरील आकाशगंगेचे फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये अब्जावधी तारे आणि आकाशगंगांना दोन्ही बाजूंनी हात असल्याचे दिसते. या आकाशगंगांमध्ये वैज्ञानिकांना रस आहे कारण यांच्या मध्यात ब्लॅक होल असण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.