AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1999 रुपयात दोन वर्षांसाठी कॉलिंग, डेटा आणि फोन FREE; JioPhone कसा खरेदी करायचा?

आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फोनसह अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि इतर सुविधा मिळतील, त्याही केवळ 1999 रुपयांमध्ये रुपयांमध्ये.

1999 रुपयात दोन वर्षांसाठी कॉलिंग, डेटा आणि फोन FREE; JioPhone कसा खरेदी करायचा?
Jiophone Offer
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 9:58 PM
Share

मुंबई : दरमहा रिचार्ज करणे खूप त्रासदायक आहे, म्हणून जर आपल्याला असा एखादा प्लॅन मिळाला ज्यात दोन वर्षे अर्थात 730 दिवसांसाठी सर्व काही विनामूल्य उपलब्ध असेल तर लॉटरी लागल्यासारखंच आहे, नाही का? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फोनसह अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि इतर सुविधा मिळतील, त्याही केवळ 1999 रुपयांमध्ये रुपयांमध्ये. (How to buy JioPhone : get data, calling and phone for FREE for 2 years in just Rs 1999)

ही ऑफर जिओने (Jio) सादर केली आहे आणि यात तुम्हाला दोन वर्षांसाठी अवघ्या 1999 रुपयात सर्वकाही विनामूल्य मिळेल आणि त्यासोबत जिओफोन (JioPhone) देखील विनामूल्य मिळेल. यासह, आपल्याला दरमहा 2 जीबी डेटा मिळेल, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच आपण सर्व Jio अॅप्सचा विनामूल्य अॅक्सेस मिळवू शकता.

1499 रुपयांमध्येदेखील सर्वकाही फ्री

1999 च्या दोन वर्षांच्या प्लॅनसह जिओने 1499 रुपयांचा प्लॅनदेखील सादर केला आहे, ज्यात तुम्हाला एका वर्षासाठी JioPhone सह सर्व काही विनामूल्य मिळेल. यात तुम्हाला एका वर्षासाठी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दरमहा 2 जीबी डेटाचा लाभ देण्यात येईल.

JioPhone मध्ये काय आहे खास?

हा फोन KaiOS वरच चालतो आणि तुम्ही या फीचर फोनवर FACEBOOK, YOUTUBE आणि WHATSAPP सारखे अॅप्सदेखील वापरू शकता. यामध्ये तुम्ही 4G स्पीडने इंटरनेट वापरु शकता. याचं कॉम्पॅक्ट डिव्हाईस या फोनला अधिक युजर फ्रेंडली बनवतो. तसेच यामध्ये 320 x 240 पिक्सेल रिजोल्यूशनसह 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले मिळेल. यात 1.2GHz ड्युअल कोर प्रोसेसर आहे आणि हा फोन 512MB रॅमसह सादर करण्यात आला आहे, जो मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे वाढविला जाऊ शकतो. या फोनमध्ये 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सल रीअर कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन ऑर्डर कसा कराल?

हा फोन बुक करण्यासाठी तुम्हाला Jio.com वर जावं लागेल आणि तेथील JioPhone च्या सेक्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला 1999, 1499 च्या दोन फोनचे प्लॅन्स मिळतील. यात तुमच्या सोयीनुसार फोन निवडल्यानंतर Book Now वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करुन नोंदणी करावी लागेल. सोबत एक OTP जनरेट करावा लागेल. ओटीपी सबमिट केल्यावर तुम्ही सहजपणे फोन बुक करू शकता. या फोनच्या डिलिव्हरीसाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय तुम्ही रिलायन्स स्टोअर किंवा इतर रिटेल स्टोअरमधूनही तुम्ही हा फोन खरेदी करू शकता.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(How to buy JioPhone : get data, calling and phone for FREE for 2 years in just Rs 1999)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.