फोनमध्ये पाणी गेल्यावर घाबरू नका, ‘या’ टिप्स येतील नक्कीच कामी
चुकून तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाणी शिरले किंवा फोन पाण्यात पडला तर तुम्ही काय कराल? कारण स्मार्टफोनची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुमच्या फोनमध्ये पाणी गेल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स वापरू शकता.

मोबाईल ही आता प्रत्येकाची गरज झाली आहे. त्यामुळे अगदी विद्यार्थ्यांपासून ते घरातल्या प्रत्येक मंडळींपर्यंत आपापला खाजगी फोन असतोच. मोबाईल कुठे पडणार नाही, याची आपण पुरेशी काळजी घेतोच. पण कधीतरी चुकून मोबाईल नेमका पाण्यातच पडतो. अशावेळी नेमकं काय करावं हे अनेकांना समजत नाही. बऱ्याचदा घाई गडबडीत आपण केलेल्या एका चुकीमुळे फोन खराब होतो. त्यात अनेकांना असे वाटते की फोनमध्ये पाणी गेल्यावर तो लगेच खराब होतो, पण असे अजिबात नाही. समजा चुकून तुमचा फोन पाण्यात पडला तर या काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही पुन्हा आहे त्या स्थितीत चालू करू शकता. यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाही. चला जाणून घेऊयात या सोप्या ट्रिक्स…
फोनमध्ये पाणी गेल्यावर काय करावे?
होळी खेळताना जर तुमच्या फोनमध्ये पाणी शिरले तर घाबरून जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही फक्त या काही गोष्टी करायला हव्यात.
तुमचा स्मार्टफोन बंद करा : तुमचा फोनमध्ये पाणी शिरल्यास तुम्ही तो ताबडतोब बंद करण्याचा प्रयत्न करा. तसेच मोबाईल जर पाण्यात पडला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थोडा वेळ तो सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करून नका. तसेच तो चार्जिंगलाही लावू नका. यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.
सिम कार्ड आणि मेमरी कार्ड : फोन बंद केल्यानंतर, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून टाका. यामुळे, फोनमध्ये पाणी शिरले तरी सिम कार्ड आणि मेमरी कार्डचे नुकसान होत नाही.
फोन सुकवा : फोन मोकळ्या हवेत ठेवा. अशी जागा निवडा जिथे अजिबात ओलावा नाही. तसेच तुम्ही पंखा चालवू ठेवून फोन सुकवू शकता.
तांदळात ठेवा : जर तुमच्या फोनमध्ये पाणी शिरले असेल तर तुम्ही तो फोन काही तासांसाठी तांदळाच्या पिशवीत किंवा तांदळ्याच्या डब्ब्यात ठेवू शकता. कारण तांदूळ ओलावा लवकर शोषून घेतो.
सर्विस सेंटर : वर नमूद केलेल्या पद्धती वापरूनही जर तुमचा फोन काम करत नसेल, तर तुमचा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत सर्विस सेंटरेमध्ये घेऊन जा. सर्विस सेंटर तुमचा फोन अधिक चांगल्या प्रकारे तपासू ठिक करून देऊ शकतात.