हेअर स्ट्रेटनरमुळे केसांना इजा होते का ? कसा करावा बचाव

प्रेसिंग मशीन वारंवार वापरल्यामुळे केसांची बाहेरील लेअर कमकुवत होते. अशा परिस्थितीमध्ये प्रेसिंग मशीन वापरताना योग्य तंत्राचा वापर करणे आणि मशीनचा योग्य वापर महत्वाचा आहे.

हेअर स्ट्रेटनरमुळे केसांना इजा होते का ?  कसा करावा बचाव
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 7:47 AM

नवी दिल्ली : प्रेसिंग मशीनला हॉट कॉम्ब किंवा स्ट्रेटनर (hair straightner) असेही म्हणतात. हे उष्णता वापरून केस सरळ करते. हे विशेषतः कुरळे केस (curly hair) सरळ आणि गुळगुळीत अथवा स्मूथ करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये, दोन्ही बाजूंना गुळगुळीत प्लेट्स दिल्या आहेत, ज्यामुळे केस उष्णतेने सरळ होतात. मात्र, स्ट्रेटनरचा वापर योग्य प्रकारे न केल्यास केसांचे खूप नुकसान (hair damage) होऊ शकते. प्रेसिंग मशीनमधील उष्णता केसांच्या बाहेरील थराला नुकसान पोहोचवू शकते.

हेअर स्ट्रेटनरचा वारंवार वापर केल्याने केसांची बाहेरील लेअर कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे केस तुटणे, दुभंगणे आणि केसगळती सुरू होणे, अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, हेअर स्ट्रेटनर वापरताना केसांना होणारा हानीचा धोका कमी करण्यासाठी योग्य तंत्राचा अवलंब करणे आणि उपकरणाचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया.

योग्य तापमानाची निवड करावी

बहुतांश हेअर स्ट्रेटनिंग मशीन्स मध्ये ॲडजस्टेबल तापमान सेटिंग्ज असतात. यामुळे, नुकसान टाळण्यासाठी तुमच्या केसांच्या प्रकारानुसार, योग्य तापमान सेट करा. पातळ केसांसाठी, सामान्यतः कमी तापमान वापरा.

हीट प्रोटेक्टंटचा करावा वापर

हेअर स्ट्रेटनिंग मशीन्सचा वापर करण्यापूर्वी केसांना हीट प्रोटेक्टंट लावावे. त्यामुळे नुकसान कमी होण्यास मदत होऊ शकते. जास्त जोरात प्रेस करू नका.  खूप जोराने दाबल्याने किंवा हेअर स्ट्रेटनर जास्त वेळ एकाच ठिकाणी दाबून ठेवल्याने केस खराब होतात. अशा प्रकारे, हलक्या दाबाने केसांमधून टूल समान रीतीने हलवण्याचा प्रयत्न करा.

कंडीशनिंग ट्रीटमेंट

कंडिशनिंग ट्रीटमेंट केसांना मजबूत करण्यास आणि उष्णतेच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. केराटिन किंवा आर्गन ऑइलसारखे घटक असलेली उत्पादने वापरावीत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.