How to Save A Wet Mobile: पावसात मोबाइल भिजलाय? अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त घरच्या घरी या आयडीया वापरा; बंद झालेला फोन सुरु होईल

पावसाळा सुरु झाला की मोबाइलच्या बाह्य भागाचे लॅमिनेशन करणे, प्लास्टिकच्या पिशवीत तो व्यवस्थित गुंडाळणे, पावसातून जाता-येता तो न हाताळणे अशा प्रकारची खबरदारी आपण सर्वच जण आवर्जून घेतो. परंतु एवढे करूनही आपला मोबाइल अजिबात भिजणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. एखाद्या मुसळधार पावसात किंवा अचानक आलेल्या सरींमध्ये मोबाइलही ‘न्हाऊन’ निघतो आणि मग चिंता सतावते, आता याचे काय करायचे?असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला दरवर्षीच्या पावसाळय़ात एकदा तरी पडतो(Use this idea if your Mobile gets wet).

How to Save A Wet Mobile: पावसात मोबाइल भिजलाय? अजिबात टेन्शन घेऊ नका, फक्त घरच्या घरी या आयडीया वापरा; बंद झालेला फोन सुरु होईल
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 7:54 PM

पावसाळ्यात मोबाईल सांभळणे म्हणजे सर्वात टेन्शन वालं काम. पावसाळा सुरू होताच दरवर्षी मोबाइलच्या सुरक्षिततेची समस्या भेडसावू लागते. बऱ्याचदा पावसात भिजून मोबाईल(Wet Mobile) बंद पडतो. यामुळे मोठी अडचण निर्माण होते. मात्र, घरच्या घरी काही आयडिया वापरल्यास तुमचा बंद झालेला फोन पुन्हा सुरु होईल.

पावसाळा सुरु झाला की मोबाइलच्या बाह्य भागाचे लॅमिनेशन करणे, प्लास्टिकच्या पिशवीत तो व्यवस्थित गुंडाळणे, पावसातून जाता-येता तो न हाताळणे अशा प्रकारची खबरदारी आपण सर्वच जण आवर्जून घेतो. परंतु एवढे करूनही आपला मोबाइल अजिबात भिजणार नाही, याची शाश्वती देता येत नाही. एखाद्या मुसळधार पावसात किंवा अचानक आलेल्या सरींमध्ये मोबाइलही ‘न्हाऊन’ निघतो आणि मग चिंता सतावते, आता याचे काय करायचे?असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला दरवर्षीच्या पावसाळय़ात एकदा तरी पडतो(Use this idea if your Mobile gets wet).

या सोप्या ट्रिक्स वापरुन पाहा

  • मोबाइल बंद करा आणि उभा ठेवा. सिम कार्ड आणि मायक्रो एसडी कार्ड बाहेर काढून ठेवा.
  • जर तुमच्या फोनमधील बॅटरी वेगळी करता येणारी असेल तर बॅटरी काढून बाजूला ठेवा. मात्र ‘नॉन रिमूव्हेबल’ बॅटरी असेल तर ती बळजबरीने मोबाइलपासून वेगळी करण्याचा प्रयत्न करू नका.
  • कोरड्य़ा कपड्य़ाने किंवा कागदी नॅपकिनने फोन पुसून घ्या. पुसताना मोबाइलवरील पाणी अलगद टिपा. घाईने किंवा रगडून मोबाइल पुसण्याच्या प्रयत्नात मोबाइलच्या स्क्रीनवर ओरखडे निर्माण होण्याची किंवा पाणी आतल्या भागात शिरण्याची शक्यता असते.
  • सिम कार्ड, मेमरी कार्ड किंवा चार्जिगसाठीच्या ‘स्लॉट’मध्ये गेलेले पाणी फुंकर मारून किंवा छोटय़ा ‘ब्लोअर’च्या मदतीने बाहेर काढा.
  • मोबाइल फोन कोरडा करण्यासाठीचे विशेष ‘पाऊच’ बाजारात मिळतात. त्यांची मदत घ्या.
  • मोबाइल पूर्णपणे सुकल्याखेरीज त्यात सिम कार्ड किंवा मेमरी कार्ड टाकू नका. तसेच तो चार्ज करण्याचा प्रयत्नही करू नका.
  • कोरडा झालेला फोन सुरू केल्यानंतर स्क्रीन, आवाजाची बटणे, चार्जिग पोर्ट तपासून पाहा. कॅमेरा, स्पीकर यांचीही चाचणी घ्या.
  • तांदळाचा आधार
  • तुमचा मोबाइल पाण्यात भिजल्याने बंद पडला तर मोबाइलच्या आकारापेक्षा मोठय़ा वाटीत वा भांडय़ात तांदूळ घेऊन त्यात किमान 24 तास मोबाइल बुडवून ठेवा. तांदूळ मोबाइलवरील पाणी पूर्णपणे शोषून घेतो. साधारण 24 तासांत तुमचा मोबाइल पूर्णपणे कोरडा होईल. त्यानंतरही तो सुरू न झाल्यास आणखी काही तास तांदळात तो बुडवून ठेवा.
  • ही प्रक्रिया अधिक वेगवान करायची असेल तर तुम्ही तांदळाऐवजी सिलिका जेलचा वापरही करू शकता. ‘सिलिका जेल’चे पाकीट आजकाल अनेक नव्या वस्तूंमध्ये आढळते. नव्या पाकीटबंद वस्तूंमध्ये निर्माण होणारे बाष्प शोषून घेण्याचे काम सिलिका जेल करतात.

पावसात मोबाइल भिजू देऊ नये किंवा त्याचा पाण्याशी संपर्क होऊ न देणे, हा सर्वोत्तम उपाय आहे. मात्र चुकून मोबाइल भिजलाच तर सगळाच गोंधळ उडतो. बऱ्याचदा आपण थेट मोबाईल गॅलरीत धाव घेतो. यामुळे चांगलाच आर्थिक फटका बसतो. मात्र, या घरगुती ट्रिक्स वपारुन पाहिल्यास आपल्याला आपला मोबाइल वाचवता येईल.

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.