AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyber Insurance: सायबर इन्शुरन्सचा कसा घ्याल फायदा, फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई कशी मिळवणार? वाचा हा रिपोर्ट

डिजिटल व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दरम्यान, आपण गाडी, कार यासह अनेक गोष्टींचा विमा काढतो. तशाच प्रकारचा विमा आता तुम्हाला सायबर गुन्हेगारीपासून बचावासाठी देखील काढता येणार आहे.

Cyber Insurance: सायबर इन्शुरन्सचा कसा घ्याल फायदा, फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई कशी मिळवणार? वाचा हा रिपोर्ट
सायबर इन्शुरन्सImage Credit source: social
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jul 13, 2022 | 8:50 AM
Share

मुंबई : सायबर (Cyber) फसवणुकीच्या वाढत्या घटनां वाढतायत. यामध्ये आपण देखील फसू शकतो. सायबर फडवणुकीच्या घटना वाढत असल्यानं  आता तुमच्याकडे ‘सायबर विमा’ (Cyber Insurance) असणं आवश्यक आहे. हा एक प्रकारचा करार आहे. यामध्ये ऑनलाइन व्यवसाय कंपनी किंवा व्यक्ती आर्थिक जोखीम टाळण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी करते. सायबर गुन्ह्यांमुळे होणारे नुकसान निश्चित शुल्काच्या बदल्यात कव्हर केले जाते. पण, सायबर इन्शुरन्सलाही मर्यादा असते, हे तुम्हाला माहिती आहे का,  त्यामुळे डिजिटल व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दरम्यान, आपण गाडी, कार (Car) यासह अनेक गोष्टींचा विमा काढतो. तशाच प्रकारचा विमा आता तुम्हाला सायबर गुन्हेगारीपासून बचावासाठी देखील काढता येणार आहे. याचविषयी आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. सायबर इन्शुरन्सचे फायदे जाणून घ्या….

पॉलिसी समजून

सायबर इन्शुरन्स घेताना पॉलिसीची चांगली माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला पॉलिसीपासून कोणतं संरक्षण मिळेल आणि गरज पडल्यास ते कसे वापरावे याची जाणीव असायला हवी. विमा पॉलिसीमध्ये विविध प्रकारचे सायबर धोके दिलेले आहेत. जर तुम्ही जास्त ऑनलाइन व्यवहार करत असाल तर जास्त मर्यादा असलेली पॉलिसी घेणे चांगले.

या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  1. सायबर गुन्ह्यांचे किती धोके कव्हर केले जात आहेत हे लक्षात ठेवा
  2. सायबर ठग तुमची संवेदनशील माहिती चोरतात, जसे की- बँक खाते तपशील आणि ओळख इ.
  3. हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो संगणक, मोबाईल आणि टॅबलेट इत्यादी डिजिटल उपकरणांमधून वैयक्तिक माहिती चोरतो.
  4. सिम स्वॅप यामध्ये- तंत्रज्ञानाच्या मदतीने मूळ सिमऐवजी डुप्लिकेट सिम तयार केले जाते. याद्वारे बँक खात्यातून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले जातात.
  5. क्रेडेन्शियल स्टफिंग यामध्ये फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती गोळा करतात.

पॉलिसीमध्ये काय समाविष्ट करावे

जर तुम्ही सायबर विमा पॉलिसी निवडत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवा….

  1. स्पूफिंग आणि फिशिंगमुळे आर्थिक नुकसान बँक खाते किंवा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित महत्त्वाच्या माहितीची चोरी.
  2. ई-वॉलेटद्वारे ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक.
  3. ओळख चोरीनंतर संबंधित नुकसान आणि खर्चाची माहिती.
  4. व्हायरस इत्यादींमुळे डेटा किंवा संगणक प्रोग्रामचे नुकसान झाल्यानंतर त्यांना पुन्हा स्थापित करण्याची किंमत.

अशी बाळगा सावधता

तुम्ही स्वतः सायबर विमा असला तरीही तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण, बहुतेक लोक केवळ त्यांच्या संगणक आणि स्मार्टफोनवरूनच नव्हे तर कार्यालयीन संगणक आणि सार्वजनिक वाय-फाय वरून देखील आर्थिक व्यवहार करतात. बाह्य उपकरणांवरून वैयक्तिक माहिती ऍक्सेस करण्यामध्ये उच्च मोठा असतो. सायबर हल्ले कसे होतात हे कळायला हवे. कोणत्या परिस्थितीत नुकसान होऊ शकते आणि सायबर हल्ले कसे टाळताही येऊ शकतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?