
सिमचा गैरवापर होऊ शकतो. तुमच्या नावाने कुणी दुसरे सिम वापरु शकते. सरकारी वेबसाईटवरून तुमच्या आधारवर किती सिम अॅक्टिव्ह आहेत ते तपासता येते. तुमच्या नावावर दुसरा कोणताही नंबर चालत नाहीये ना, हे तपासून घेणं गरजेचं आहे. कारण, तुमच्या सिमचा गैरउपयोग होऊ शकतो.
तुमच्या नावाने घेतलेले सिम कोणत्याही बेकायदेशीर कामात वापरले तर तुम्ही कायदेशीर अडचणीत सापडाल, हे तुम्हाला माहित आहे का? आजच्या काळात सर्व काही डिजिटल असताना कोणाच्याही नावावर सिम मिळणे ही काही मोठी गोष्ट नाही. कदाचित तुमच्या नावावरही सिम घेतले असतील! मात्र, आता एक सरकारी अॅप आहे ज्याच्या मदतीने तुम्ही दोन मिनिटात शोधू शकता, की तुमच्या नावावर दुसरा कोणताही नंबर चालत नाहीये. इतकंच नाही तर या अॅपच्या मदतीने तुम्ही मॅन्युअली असा नंबरही बंद करू शकता. चला जाणून घेऊया या खास अॅपबद्दल आणि चुकीचा नंबर कसा बंद करायचा.
अॅक्टिव्ह नंबर कसा शोधायचा?
तुमच्या आयडीवर किती आणि कोणते नंबर अॅक्टिव्ह आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सरकारी वेबसाईटवर https://www.sancharsaathi.gov.in/ शकता. येथे तुम्हाला सिटीझन सेंट्रिक सर्व्हिसेसवर क्लिक करावे लागेल आणि ‘नो योर मोबाइल कनेक्शन्स (टीएएफसीओपी)’ वर जावे लागेल. येथे आपला मोबाइल नंबर, कॅप्चा आणि ओटीपीद्वारे आपली ओळख पडताळून पहा. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेले सर्व मोबाईल नंबर स्क्रीनवर दिसतील. अशाप्रकारे वेळोवेळी आपल्या नावाचे सिम दुसरे कोणी चालवत आहे की नाही हे तपासून पाहावे. असे केल्यास अनेक प्रकारच्या फसवणुकीपासून आणि ठगांपासून तुम्ही स्वत:चे रक्षण करू शकाल.
चुकीचा नंबर कसा बंद करावा
आपल्याला माहिती नसलेला नंबर बंद करण्यासाठी तुम्हाला “नॉट माय नंबर” हा पर्याय निवडावा लागेल. या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही चुकीचा नंबर नोंदवू शकाल. नंबर रिपोर्ट झाल्यानंतर मेसेज म्हणून त्याची कन्फर्मेशनही मिळेल. यानंतर तो चुकीचा नंबर डिअॅक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. दूरसंचार विभाग सिमकार्डचा वापर करून होणारी फसवणूक रोखण्यात गुंतला आहे. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या आधार कार्डचा वापर करून सिम घेताना पकडली गेली तर त्याला पुढील 3 वर्ष सिम मिळू शकणार नाही.
दूरसंचार विभागाच्या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लाखो बनावट सिमकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत. तसेच सिम जारी करण्यासाठी ई-केवायसी प्रणाली आणि चेहऱ्याची पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे.