Instagram, WhatsApp आणि Facebook वर ‘Imagine me’नवीन इमेज टूल लाँच, जाणून घ्या प्रोसेस
मेटाने भारतात त्यांचे AI-पावर्ड टूल Imagine me लाँच केले आहे. हे टूल वापरकर्त्यांना त्यांचे फोटो वेगवेगळ्या रूपात रूपांतरित करण्याची परवानगी देते. चला तर मग आजच्या या लेखात आपण या नवीन इमेज टूल बद्दल जाणून घेऊयात...

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने भारतात त्यांचे नवीनतम AI-पावर्ड टूल Imagine me हे नवीन फिचर लाँच केले आहे. या टूलच्या मदतीने वापरकर्ते व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरवर मेटा एआय चॅटबॉटद्वारे त्यांचे फोटो कस्टमाइझ आणि रीस्टाइल करू शकतात. मेटाने प्रथम हे टूल अमेरिकेत त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मसाठी – इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, मेसेंजर आणि मेटा एआय ॲपसाठी सादर केले होते. आता कंपनीने ते भारतात लाँच केले आहे. अशातच भारतात हे फीचर फक्त व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वापरण्यात येणार आहे,
या नवीन फिचर्समुळे वापरकर्त्यांना साध्या मजकूर प्रॉम्प्टमध्ये फोटो तयार करू शकणार आहे. इमॅजिन मी टूलच्या मदतीने वापरकर्ते टेक्स्ट प्रॉम्प्टच्या मदतीने एखाद्या वेगळ्या रूपात फोटो तयार करू शकतील. वापरकर्त्यांना फक्त इमॅजिन मी अॅज असे प्रॉम्प्ट लिहावा लागेल. जसे की, जर तुम्ही इमॅजिन मी अॅज अ सुपरमॅन असे लिहून प्रॉम्प्ट दिला तर मेटाचे हे टूल तुमची इमेज सुपरमॅनसारखी बनवेल. वापरकर्त्यांना इमेज तयार करण्यासाठी समोरून तसेच डावीकडे आणि उजवीकडून अशा तिन्ही साईडने सेल्फी द्यावे लागतील.
मेटाच्या इमॅजिन मी टूलने तयार केलेल्या सर्व फोटोंवर AI वॉटरमार्क असेल, ज्यावर इमॅजिन्ड विथ AI असे लिहिले असेल. जर तुम्हालाही मेटाचे हे नवीन टूल वापरायचे असेल, तर आपण या स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा.
इमॅजिन मी टूल कसे वापरावे?
स्टेप 1 – सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इंस्टाग्राममध्ये मेटा एआय चॅट उघडावे लागेल.
स्टेप 2 – यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉम्प्ट “Imagine me as सोबत तुम्हाला फोटो कसा कस्टमाइझ किंवा रिस्टाईल करायचा आहे एखाद्या कॅरेक्टर सोबत त्याचे नाव लिहावे लागेल.
स्टेप 3 – यानंतर तुम्हाला तुमचा फेशियल डेटा मेटा एआयला द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रोफाइलचे म्हणजेच समोर, डावीकडून आणि उजवीकडून सेल्फी अपलोड करावे लागतील.
यानंतर मेटाचे एआय टूल तुमच्या प्रॉम्प्टनुसार चित्र तयार करेल. जर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही ते सहजपणे करू शकता.
