AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक खात्यात आता किमान एवढा मिनिमम बॅलेन्स ठेवणे बंधनकारक; अन्यथा पॅनेल्टी लागणार, नवीन नियम लागू

बॅंकेनं बचत खात्यांसाठी मिनिमम बॅलेन्स रकमेचे नियम कडक केले आहेत. मिनिमम बॅलेन्सची रक्कम आता वाढवण्यात आली आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जाणार आहे. ग्राहकांनी बँकेकडून येणारे एसएमएस आणि ईमेल काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.

बँक खात्यात आता किमान एवढा मिनिमम बॅलेन्स ठेवणे बंधनकारक; अन्यथा पॅनेल्टी लागणार, नवीन नियम लागू
Bank Raises Minimum Balance, New Rules & PenaltiesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2025 | 1:57 PM
Share

बॅंकेबाबतचे नियम हे सतत बदलतच असतात. आता देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या ICICI बँकेने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे.  सेव्हिंग अकाउंटमधील रक्कमेबद्दल एक मोठा नियम घेण्यात आला आहे. सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान बॅलेन्स किती असावा याचे नियम बदलण्यात आले आहेत.

एवढा मिनिमम बॅलेन्स असणे बंधनकारक

या बॅंकेत नवीन खाते उघडणाऱ्या ग्राहकांना महानगर आणि शहरी शाखांमध्ये दरमहा सरासरी किमान 50, 000 रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. पूर्वी ही मर्यादा 10,000 रुपये होती. तर काही शहरांमधील बॅंक शाखांमध्ये ही रक्कम 5000 रुपये होती, ती आता 25000 रुपये करण्यात आली आहे. तर ग्रामीण शाखांमध्ये आता किमान शिल्लक रक्कम ही 5000 रुपयांऐवजी 10,000 रुपये ठेवावी लागणार आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, हा बदल नवीन ग्राहकांसाठी लागू असणार आहे आणि तसेच या निमयमांचे उल्लंघन केल्यास दंडही आकारला जाऊ शकतो.

किमान शिल्लक म्हणजे काय?

किमान शिल्लक म्हणजे दरमहा किंवा तिमाहीत तुमच्या बचत खात्यात ठेवावी लागणारी सरासरी रक्कम. जर ही सरासरी रक्कम दिलेल्या बॅलेन्सपेक्षी जर कमी असेल तर पैसे दंड स्वरुपात कापले जाणार. शाखेच्या स्थानानुसार आणि खात्याच्या प्रकारानुसार हा नियम वेगवेगळ्या बँकांमध्ये बदलला जाऊ शकतो. म्हणजे दंडाची रक्कम ही थोड्याफार फरकाने वेगळी असू शकते.

या खात्यांमध्ये पैसे नसले तरीही दंड आकारला जाणार नाही.

तसेच हा नियम ICICI बॅंकेबाबत आहे. तसेच नियम इतर बॅंकेच्याबाबतही असणार आहे. फक्त त्याची शिल्लक रक्कमेचा आकडा थोड्याफार फरकाने वेगळा असू शकतो. पण त्याच वेळी, प्रधानमंत्री जनधन योजना, ग्रामीण बँक आणि सहकारी बँकेच्या खात्यांमध्ये अजूनही शून्य बॅलन्सची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच अशा खात्यांमध्ये पैसे नसले तरीही दंड आकारला जाणार नाही.

आरबीआयचा नवीन नियम

आरबीआयच्या मते, जर खात्यातील रक्कम निश्चित शिल्लक रकमेपेक्षा कमी असेल तर खाते निगेटीव्हमध्ये जाते. म्हणजे ग्राहक पैसे जमा करताच बँक दंडाची रक्कम कापते. उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यासाठी बॅंकेच्या नियमाप्रमाणे 1000 रुपये दंडाची रक्कम असेल आणि तुम्ही खात्यात शून्य बॅलेन्स असताना 5000 रुपये जमा केले तर बँक थेट तुमचे 1000 रुपये कापणार म्हणजे तुमच्या खात्यात फक्त 4000 रुपये शिल्लक राहतील.

ग्राहक स्वतःचे नुकसान होण्यापासून कसे वाचू शकतात?

ग्राहकांनी बँकेने पाठवलेला प्रत्येक एसएमएस आणि ईमेल काळजीपूर्वक वाचला पाहिजे. खात्यात नेहमीच किमान निश्चित रक्कम शिल्लक ठेवली पाहिजे. जर बँक कोणत्याही कारणास्तव खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू करते, तेव्हा बॅंक प्रथम खातेधारक किंवा त्याच्या नामांकित व्यक्तीशी संपर्क साधते. म्हणूनच वेळेवर अपडेट्सकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.