एअरटेलच्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये मिळणार अमर्यादित 4G व 5G डेटा, जाणून घ्या अनेक प्रीमियम फायदे

एअरटेलने त्यांच्या काही प्रीपेड प्लॅन पुन्हा बदलले आहेत. ज्यामध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित 4G आणि 5G डेटा दिला जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदे देखील मिळत आहेत. चला तर मग आजच्या लेखात एअरटेलच्या या नवीन प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

एअरटेलच्या या नवीन प्लॅनमध्ये मिळणार अमर्यादित 4G व 5G डेटा, जाणून घ्या अनेक प्रीमियम फायदे
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 4:49 PM

एअरटेल कंपनीने काही प्रीपेड प्लॅनसह अमर्यादित 4G डेटा असलेला प्लॅन वापरकरर्त्यांसाठी सुरू केला आहे. प्लॅन तेच आहेत, परंतु डेटा बेनिफिट अमर्यादित करण्यात आले आहेत. हा अमर्यादित डेटा बेनिफिट 4G आणि 5G दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. एअरटेलच्या 399 रूपयांच्या आणि 449 रूपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये हे बेनिफिट्स मिळत आहे. दोन्ही प्लॅन संपूर्ण भारतात उपलब्ध आहेत. अमर्यादित 4G डेटासह वापरकर्त्यांना आणखीन कोणते फायदे मिळतील याबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

एअरटेलचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

टेलिकॉमटॉकच्या अहवालानुसार, भारती एअरटेलचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित 4G आणि 5G डेटा देतो. तर अमर्यादित 4G आणि 5G डेटा ज्यामध्ये 300 जीबी वापरकर्त्यांना 30 दिवसांची वैधतेसह मिळत आहे. तर व्हीआय ग्राहकांसाठी इतर अमर्यादित 4G व 5G डेटा असलेला प्लॅन हा 28 दिवसांसाठी 300 जीबी पर्यंत वैधतापर्यंत येतो. तर एअरटेलचा हा नवीन प्लॅन त्यांच्यासाठी आहे ज्यांना कमी सर्विस वॅलिडिटी वैधता आणि अधिक डेटा वापराची आवश्यकता आहे.

एअरटेल वापरकर्त्यांना या नवीन प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

एका वर्षासाठी Adobe Express Premium

Airtel Xstream Play चा मोफत प्रवेश

मोफत Hellotunes

एअरटेलचा 449 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

भारती एअरटेलच्या 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​सेवा वैधता 28 दिवसांची आहे. मात्र नवीन प्लॅनसह वापरकर्त्यांना अमर्यादित 4G आणि 5G डेटा हा 30 दिवसांसाठी 300 GB वैधतापर्यंत मिळत आहे. अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सेवा देखील मिळत आहे. एअरटेलने या प्लॅनमध्ये कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता अनेक अतिरिक्त फायदे देखील समाविष्ट केले आहेत.

या प्लॅनचे फायदे

Google One 30 जीबी क्लाउड स्टोरेज

28 दिवसांसाठी JioHotstar Mobile

Airtel Xstream प्लेचा भाग म्हणून SonyLIV + 20 OTT

सहा महिन्यांसाठी अ‍ॅपल म्युझिक

मोफत हॅलोट्यून्स

सध्या अमर्यादित 4G आणि 5G डेटा असलेल्या ग्राहकांना हे दोन प्लॅन उपलब्ध आहेत. तर प्लॅनमध्ये अमर्यादित 4G डेटा समाविष्ट करण्याचा फायदा असा आहे की 5G नसलेल्या ग्राहकांना दैनंदिन डेटा 1.5GB किंवा 2GB पर्यंत पोहोचल्यानंतर कमी-स्पीड इंटरनेट वापरावे लागणार नाही. ग्राहक आता दरमहा फक्त 300GB पर्यंत अमर्यादित 4G वापरू शकतील जसे ते अमर्यादित 5G डेटा वापरतात.