64MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह Infinix चे नवे स्मार्टफोन लाँच, किंमत 11 हजारांहून कमी

Infinix कंपनीने आड इन्फिनिक्स नोट 10 (Infinix Note 10) आणि इन्फिनिक्स नोट 10 प्रो (Infinix Note 10 Pro) असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

64MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह Infinix चे नवे स्मार्टफोन लाँच, किंमत 11 हजारांहून कमी
Infinix Note 10 Series
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 4:16 PM

मुंबई : Infinix ने Note 10 Series मधील स्मार्टफोन लाँच करण्यासह भारतातील आपली लाइनअप आणखी वाढविली आहे. आज कंपनीने इन्फिनिक्स नोट 10 (Infinix Note 10) आणि इन्फिनिक्स नोट 10 प्रो (Infinix Note 10 Pro) असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटच्या माध्यमातून विकले जातील. या स्मार्टफोनचा पहिला सेल फ्लिपकार्टवर 13 जून रोजी होणार आहे. (Infinix Note 10 Series smartphone launched at less than 11000 price, increase storage up to 2TB)

या दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमतींबद्दल बोलायचे झाल्यास Infinix Note 10 दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 64GB इंटर्नल स्टोरेज आणि 4GB RAM वाल्या फोनची किंमत 10,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे, तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेजवाल्या फोनची किंमत 11,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच Infinix Note 10 Pro मध्ये 8GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. या फोनची किंमत 16,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Infinix Note 10 आणि Infinix Note 10 Pro वर दिल्या जाण्याऱ्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही पेमेंट केलंत तर तुम्हाला दोन्ही फोनवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तसेच 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांच्या खरेदीवर फर्स्ट फ्लिपकार्ट पे लेटर ऑर्डरवर 100 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.

Infinix Note 10 चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये 6.95 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे आणि तो MediaTek Helio 85 SoC प्रोसेसरवर चालतो. मायक्रोएसडी कार्डद्वारे या फोनची स्टोरेज स्पेस 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 48MP+2MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यास 18W टाइप-सी फास्ट चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे.

Infinix Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स

अँड्रॉइयड 11 आधारित ऑपरेटिंग सिस्टम ऑउट ऑफ द बॉक्सवर चालणाऱ्या या फोनमध्ये 6.95 इंचाचा आयपीएस डिस्प्ले आहे, जो FHD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, ज्याचं रिझोल्यूशन 2460X1080 पिक्सल इतकं आहे आणि 90Hz चा रिफ्रेश रेट आहे. फोटोग्राफीसाठी यात 64MP+8MP+2MP+2MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix Note 10 Pro स्मार्टफोन MediaTek Helio G95 प्रोसेसरने पॉवर्ड आहे. microSD कार्डद्वारे या फोनची स्टोरेज स्पेस तब्बल 2TB पर्यंत वाढवता येईल. याशिवाय फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यास 33W फास्ट चार्जर सपोर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Realme कंपनी 20 पेक्षा जास्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या स्वस्त फोन कधी उपलब्ध होणार

Anniversary Sale : स्वस्तात Realme स्मार्टफोन खरेदीची संधी, कंपनीकडून 17000 रुपयांची सूट

Vivo Y73 2021 भारतात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या मिड-रेंज स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स

(Infinix Note 10 Series smartphone launched at less than 11000 price, increase storage up to 2TB)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.