Moto G31 ला टक्कर, Infinix Note 11 सिरीजचं 13 डिसेंबरला लाँचिंग, नवीन स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?

या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये असण्याची शक्यता आहे. Moto G31 देखील 12,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. Note 11 आधीच निवडक मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Moto G31 ला टक्कर, Infinix Note 11 सिरीजचं 13 डिसेंबरला लाँचिंग, नवीन स्मार्टफोनमध्ये काय असेल खास?
Infinix Note 11
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 3:39 PM

मुंबई : Infinix ही हाँगकाँगची स्मार्टफोन निर्माती कंपनी भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी भारतीय बाजारात Infinix Note 11 सिरीज लाँच करणार आहे. कंपनीने या फोनची अधिकृत लाँचिंग डेट जाहीर केली आहे. Infinix ने दिलेल्या माहितीनुसार हा फोन 13 डिसेंबर रोजी भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केला जाईल. Note 11 मध्ये 6.7 इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आहे, MediaTek Helio G88 चिपसेटसह यात 4GB पर्यंत RAM आहे. Infinix Note 11 नवीन लाँच झालेल्या Moto G31 ला टक्कर देईल, जो बजेट सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. (Infinix Note 11 series to launch in India on 13th December, know price and features)

या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपये असण्याची शक्यता आहे. Moto G31 देखील 12,999 रुपयांच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आला होता. Note 11 आधीच निवडक मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Infinix Note 11 मध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा FHD+ विविड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह MediaTek G88 प्रोसेसर वर आधारित असेल. तसेच Infinix Note 11 आउट ऑफ द बॉक्स Android 11 वर चालतो.

Infinix Note 11 चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 11 मध्ये त्याच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये क्वाड LEDs सह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto G31 ला टक्कर

Infinix Note 11 हा स्मार्टफोन बाजारात Moto G31 ला टक्कर देईल. Moto G31 मध्ये 6.4 इंचाचा FHD+ OLED पॅनल आहे. हा फोन Mediatek Helio G85 4G प्रोसेसरसह सुसज्ज आहे. जो 4GB आणि 6GB RAM तसेच 64GB/128GB इंटर्नल स्टोरेज पर्यायासह येतो. हा स्मार्टफोन मोठ्या 5,000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, ही 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, असा कंपनीचा दावा आहे.

Moto G31 मध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 118 डिग्री फील्ड-ऑफ-व्ह्यू (FoV) यांचा समावेश आहे. तसेच यात f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्सदेखील मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

इतर बातम्या

Flipkart Mobile Bonanza Sale Live : Realme, Vivo, Moto च्या स्मार्टफोन्सवर 14000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

50MP कॅमेरा, 8 GB रॅमसह Redmi Note 11T 5G बाजारात, शानदार ऑफरसह सेल लाईव्ह

अंडर डिस्ले कॅमेरा आणि ढासू फीचर्ससह Xiaomi 12 Pro या महिन्याच्या अखेरीस लाँच होणार?

(Infinix Note 11 series to launch in India on 13th December, know price and features)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.