AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडर डिस्ले कॅमेरा आणि ढासू फीचर्ससह Xiaomi 12 Pro या महिन्याच्या अखेरीस लाँच होणार?

Xiaomi ही स्मार्टफोन निर्माती कंपनी आता Xiaomi Mi 10 आणि Xiaomi Mi 11 च्या यशानंतर Xiaomi 12 सीरीजचा पहिला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

अंडर डिस्ले कॅमेरा आणि ढासू फीचर्ससह Xiaomi 12 Pro या महिन्याच्या अखेरीस लाँच होणार?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 6:00 AM
Share

मुंबई : Xiaomi ही स्मार्टफोन निर्माती कंपनी आता Xiaomi Mi 10 आणि Xiaomi Mi 11 च्या यशानंतर Xiaomi 12 सीरीजचा पहिला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने Mi हे ब्रँडिंग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने MI हे नाव काढून टाकण्यात आले आहे. म्हणूनच कंपनी आता Xiaomi 12 सीरीज आणणार आहे, ज्याअंतर्गत लवकरच पहिला फोन लॉन्च केला जाईल. Gizmochina ने एका टिपस्टरच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, Xiaomi 12 फोन अंडर डिस्प्ले फीचर्ससह लाँच होईल. मात्र कंपनीने अद्याप या फीचरची पुष्टी केलेली नाही. (Xiaomi 12 Pro to launch in december with under-display camera and new features)

वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की Xiaomi आपले तीन मोबाईल फोन लाँच करू शकते. ज्यामध्ये Xiaomi 12, Xiaomi 12X आणि Xiaomi 12 Pro यांचा समावेश असेल. 28 डिसेंबरला ही सीरीज लाँच केली जाऊ शकते. या फोनच्या ऑफिशियल लॉन्चिंगआधी त्याचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. डिजिटल चॅट स्टेशन नावाच्या टिपस्टरने सांगितले आहे की Xiaomi 12 मध्ये डिस्प्ले फीचर्स नसून पंच होल कटआउट असेल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा बसवला जाईल.

अंडर डिस्प्ले कॅमेरा

अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की Xiaomi लवकरच मिक्स 4 साठी अंडर डिस्प्ले कॅमेरा तयार करत आहे. अशा परिस्थितीत, जर अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल, तर युजर्सना फुल व्ह्यू डिस्प्लेचा अनुभव मिळतो, जो पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनमध्ये आढळतो. ZTE आणि Samsung Galaxy Fold 3 मध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा वापरण्यात आला आहे.

प्रोसेसर

याशिवाय Xiaomi 12 सीरीजच्या फोनवरून अद्याप पडदा हटवण्यात आलेला नाही. अलीकडेच लाँच केलेला Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro मध्ये वापरला जाईल. त्याच वेळी, Xiaomi 12X मध्ये स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट वापरला जाईल.

कॅमेरा आणि बॅटरी

गेल्या महिन्यात, Xiaomi 12 च्या कॅमेर्‍यासंबंधीचे तपशील समोर आले होते, ज्यामध्ये या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असल्याचे सांगितले होते. तसेच यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा वापर करण्यात आला आहे, जो वाइड अँगल लेन्ससह येईल, असा दावा करण्यात आला होता. तसेच, यात पेरिस्कोप लेन्स आणि टेलिफोटो लेन्स मिळतील. फास्ट चार्जिंगसाठी या फोनमध्ये 100W चा फास्ट चार्जर मिळू शकतो, तर दुसर्‍या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की हा फोन 120W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?

(Xiaomi 12 Pro to launch in december with under-display camera and new features)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.