जर तुमचा इंस्टाग्राम आयडी हॅक झाला असेल तर सर्वात आधी करा ‘हे’ काम, सर्वकाही होईल रिकव्हर
जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले तर घाबरू नका. तुमचे अकाउंट हॅक होताच प्रथम या गोष्टी करा. काही सोप्या ट्रिक्स वापरून, तुम्ही तुमचे अकाउंट रिकव्हर करू शकता आणि ते पुन्हा सुरक्षित करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण काही टिप्स बद्दल जाणून घेऊयात...

आज डिजिटल युगात इंस्टाग्राम हे फक्त एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राहिले नाहीये तर ते लाखो लोकांच्या ओळखीचा, ब्रँडचा आणि व्यवसायाचा एक भाग बनला आहे. परंतु जसजसा त्याचा वापर वाढला आहे तसतसे इंस्टाग्राम हॅकिंगच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत. जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट कधी हॅक झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे अकाउंट रिकव्हर करू शकता आणि ते पुन्हा सुरक्षित देखील करू शकता.
इंस्टाग्राम हॅक झाले आहे की नाही हे कसे ओळखावे?
जर इंस्टाग्राम हॅक झाला तर तुम्हाला काही संकेत मिळतात. जसे की अकाउंट आपोआप लॉग आउट होणे, लॉगिन ईमेल किंवा पासवर्ड बदलण्यासाठी नोटिफिकेशन येणे, तुमच्या परवानगीशिवाय पोस्ट किंवा स्टोरीज अपलोड होणे. ईमेल आणि मोबाईल नंबर आपोआप बदलणे आणि मित्रांना स्पॅम मेसेज पाठवणे. जर असे काही घडत असेल तर समजून घ्या की तुमचे इंस्टाग्राम अकाउंट धोक्यात आहे किंवा ते हॅक झाले आहे.
तुमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले तर काय करावे?
तुम्ही जर तुमचे अकाउंट लॉगिन करत असाल तर प्रथम पासवर्ड बदला. यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन सिक्युरिटी पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पासवर्ड पर्यायावर जा आणि पासवर्ड बदला.
‘was this you?’ या सूचनेला प्रतिसाद द्या
जर इंस्टाग्रामने तुम्हाला संशयास्पद हालचालींबद्दल ईमेल पाठवला असेल आणि विचारले असेल की हे ‘was this you? तर No, it wasn’t me हा पर्याय निवडा आणि पुढील सुचनेनुसार स्टेप्स फॉलो करा. जर तुम्ही लॉगिन करू शकत नसाल, तर‘Get Help Logging In’ फिचर्सचा वापर करा. यासाठी, ईमेल, युजरनेम किंवा फोन नंबर प्रविष्ट करा. इंस्टाग्राम तुम्हाला एक रिकव्हर लिंक पाठवेल.
ईमेलमधून रिकव्हर करा
जर हॅकरने पासवर्ड बदलला असेल पण ईमेल बदलला नसेल, तर इंस्टाग्राम एक संशयास्पद लॉगिन प्रयत्न मेल पाठवेल. तुम्ही त्यात दिलेल्या लिंकचा वापर करून तुमचे अकाउंट पुन्हा रिकव्हर करू शकता.
तुमचे इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय करा. जर काहीही काम करत नसेल, तर इंस्टाग्राम सपोर्टवर जा. अकाउंट रिकव्हरीसाठी, प्रोफाइल फोटो, युजरनेम, ईमेल इत्यादी ओळखीचा पुरावा विचारला जाईल. बर्याच प्रकरणांमध्ये इंस्टाग्राम तुम्हाला सेल्फी व्हिडिओ मागतो जेणेकरून तुमची ओळख पुष्टी करता येईल.
इंस्टाग्राम पुन्हा हॅक होण्यापासून कसे रोखायचे?
Two-Factor Authentication (2FA) चालू करा. यासाठी प्रत्येक लॉगिनवर एक कोड आवश्यक असेल, जो तुमच्या फोनवर येईल. कोणत्याही अज्ञात अॅप्सना अॅक्सेस देऊ नका. अनावश्यक थर्ड पार्टी अॅक्सेस काढून टाका. तुमचा ईमेल देखील सुरक्षित ठेवा. इंस्टाग्रामशी लिंक केलेला ईमेल देखील सुरक्षित असणे आवश्यक आहे. त्यातही 2FA चालू करा. बऱ्याचदा इंस्टाग्रामसारखे दिसणारे बनावट लिंक्स DM किंवा ईमेलमध्ये पाठवले जातात. त्यावर क्लिक करून लॉगिन तपशील प्रविष्ट करू नका.