इन्स्टाग्रामची खास योजना, रील्स पोस्ट करणाऱ्या क्रिएटर्सना 7.4 लाखांपर्यंत बोनस देणार

अधिकाधिक कंटेंट क्रिएटर्सना आकर्षित करण्यासाठी, मेटाच्या मालकीचा फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram आता रील्सवर व्हिडिओ पोस्ट करणार्‍यांना 10,000 डॉलर्सपर्यंत (7,43,450 रुपये) बोनस ऑफर करत आहे.

इन्स्टाग्रामची खास योजना, रील्स पोस्ट करणाऱ्या क्रिएटर्सना 7.4 लाखांपर्यंत बोनस देणार
Instagram

मुंबई : अधिकाधिक कंटेंट क्रिएटर्सना आकर्षित करण्यासाठी, मेटाच्या मालकीचा फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म Instagram आता रील्सवर व्हिडिओ पोस्ट करणार्‍यांना 10,000 डॉलर्सपर्यंत (7,43,450 रुपये) बोनस ऑफर करत आहे. 9to5Mac नुसार, क्रिएटर्सना आता Reels Play बोनस प्रोग्रामचा भाग म्हणून Reels नावाचे छोटे व्हिडिओ पोस्ट करून $10,000 पर्यंत कमाई करण्याची संधी असेल. (Instagram now paying up to 10,000 USD bonus to creators for posting reels Video)

अहवालात टेकक्रंचचा हवाला देऊन म्हटले आहे की, बोनस प्रोग्रामचे नियम युजर्सना अद्याप स्पष्ट नाहीत. 50,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या क्रिएटरने महिन्याला $1,000 कमावले, परंतु त्याहून अधिक फॉलोअर्स असलेल्या काही लोकांनी फक्त $600 कमावले. इतर क्रिएटर्सनी सांगितले की, त्यांनी एका महिन्यात पोस्ट केलेल्या सर्व रील्सवर 1.7 मिलियन व्ह्यूज मिळाल्यानंतर त्यांना $800 ऑफर करण्यात आले.

Instagram च्या मते, काही क्रिएटर्ससह बोनस प्रोग्रामची चाचणी केली जात आहे आणि आम्ही अद्याप सुरुवात करत असताना युजर्सनी चढ-उतारांची अपेक्षा केली पाहिजे. कंपनीचा दावा आहे की, भविष्यात बोनस अधिक पर्सनल होईल. हे बोनस हळूहळू आणले जात आहेत आणि अद्याप सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाहीत. सुरुवातीला, हा बोनस फक्त यूएसमध्ये उपलब्ध आहे.

Instagram दोन नवे फीचर्स आणणार

मेटाच्या (Meta) मालकीच्या फोटो-शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने घोषणा केली आहे की, ते रील्समध्ये दोन नवीन TikTok इन्सपायर्ड फीचर्स ‘टेक्स्ट-टू-स्पीच’ आणि ‘व्हॉइस इफेक्ट्स’ जोडत आहेत. इंस्टाग्रामचे टेक्स्ट-टू-स्पीच मूळ स्वरुपात युजर्सना व्हिडिओंमध्ये त्यांचा आवाज वापरण्याची परवानगी देईल. इंस्टाग्रामने व्हॉईस इफेक्ट्स फीचरदेखील जोडले आहेत. नवीन फीचरमुळे आता वेगवेगळ्या आवाजांसह मजेदार व्हिडिओ तयार करणे सोपे झाले आहे.

व्हॉइस आणि ऑडिओ वापरणे ही रील बनवण्याच्या सर्वात मजेदार पैलूंपैकी एक आहे! म्हणूनच ‘व्हॉइस इफेक्ट्स’ आणि ‘टेक्स्ट टू स्पीच’ हे दोन नवीन ऑडिओ टूल्स आम्ही लॉन्च करत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. हे फीचर आता iOS आणि Android वर Instagram युजर्ससाठी लाँच केले जात आहे. स्पीच ऑप्शनमध्ये नवीन जोडण्यासाठी, एकदा तुम्ही क्लिपमध्ये मजकूर जोडल्यानंतर, कंपोजरना स्क्रीनच्या तळाशी असलेल्या टेक्स्ट बबलवर टॅप करावे लागेल, त्यानंतर थ्री डॉट्स मेनूमधून टेक्स्ट-टू-स्पीच पर्याय निवडावा लागेल.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Instagram now paying up to 10,000 USD bonus to creators for posting reels Video)

Published On - 1:10 pm, Sun, 14 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI