AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instagram वर कोणत्या चुका वारंवार केल्यास तुमचं अकाऊंट होईल बंद, जाणून घ्या

इंस्टाग्रामवर तुम्ही या चुका पुन्हा पुन्हा केल्यास तुमचे अकाउंट ब्लॉक केले जाईल. यानंतर तुम्हाला ते पुन्हा सुरु करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेक प्रकरणांमध्ये तुम्ही तुमचे खाते कायमचे बंद होऊन जाईल. जाणून घ्या इंस्टाग्रामवर तुम्ही कोणत्या चुका करू नये.

Instagram वर कोणत्या चुका वारंवार केल्यास तुमचं अकाऊंट होईल बंद, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Feb 22, 2025 | 8:06 PM
Share

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या अ‍ॅप्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बहुतांश लोकं इंस्टाग्रामवर रील्स बघत असतात. तसेच अलीकडच्या काळात सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण इंस्टाग्रामवर सक्रिय आहेत. अशातच तुम्ही सुद्धा इंस्टाग्राम वापरत असाल आणि खूप सक्रिय असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही दिवसभर अशा अनेक चुका करता ज्यामुळे तुमचे इंस्टाग्रामवरील खाते ब्लॉक होण्याचा धोका अधिक वाढू शकतो. जर इंस्टाग्रामच्या एकाही नियमांचे व मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन झाले तर, लाखो फॉलोअर्स असलेल्या तुमच्या खात्याला इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म सोडत नाही. तुमचे खाते निलंबित किंवा ब्लॉक होण्यापासून कसे रोखता येईल ते येथे जाणून घ्या. याशिवाय एटूंचे बंद केलेले खाते कसे सुरु करता येऊ शकतात याबद्दल जाणून घेऊयात?

तुमचे इंस्टाग्राम अकाउंट कधी बॅन होते?

जर तुमचे खाते इंस्टाग्राम कम्युनिटीने ठरवलेल्या तत्त्वांचे पालन करत नसेल तर ते खाते बॅन केले जाते. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची अश्लील कंटेंट शेअर केली तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. याशिवाय जर तुम्ही तुमच्या पोस्ट किंवा रील्सवर प्रतिबंधित हॅशटॅग वापरत असाल तर तुम्हाला अकाउंट बॅनची सूचना देखील मिळू शकते. याशिवाय तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल खोटे असल्याचे सिद्ध झाले किंवा ते घोटाळ्याचा भाग असल्याचे आढळले तर तुमच्या अकाउंटवरही कारवाई केली जाऊ शकते.

इंस्टाग्रामच्या नियमांच्या तलवारीपासून कसे वाचायचे?

तुम्ही इंस्टाग्रामवर काहीही पोस्ट करू शकता. परंतु ते Instagram च्या कम्युनिटीने ठरवलेल्या तत्त्वांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटवर एखादा व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करताना कोणतेही प्रतिबंधित हॅशटॅग वापरू नका. देशाविरुद्ध किंवा राजकीय मत दर्शविणारी कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा.

जर तुमचे खाते बॅन झाले तर ते अशा प्रकारे चालू करा

काही कारणास्तव तुमचे खाते बंद केले गेले असेल तर यासाठी प्रथम तुमचे इंस्टाग्राम उघडा. सेटिंग्ज मध्ये जा आणि हेल्प सेंटरवर क्लिक करा. येथे तुम्हाला “My Instagram account has been disabled” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर तुमचे खाते तपशील भरा. यामध्ये वापरकर्त्याचे नाव, ईमेल, फोन नंबर यासारखे सर्व तपशील काळजीपूर्वक भरा. बंद होण्याचे कारण निवडा. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे तुमचे खाते ज्या पर्यायासाठी बॅन केले गेले आहे तो पर्याय निवडा. हे केल्यानंतर तुमचे अपील सबमिट करा. काही दिवसांनी पुन्हा तुमचं अकाउंट सुरु होईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.