आयटेल मार्चमध्ये लाँच करणार दोन स्मार्ट टीव्ही, डॉल्बी ऑडियोचे मिळेल सपोर्ट

| Updated on: Mar 01, 2021 | 8:05 PM

आयटेल मार्चमध्ये लाँच करणार दोन स्मार्ट टीव्ही, डॉल्बी ऑडियोचे मिळेल सपोर्ट (ITel will launch two smart TVs in March, supported by Dolby Audio)

आयटेल मार्चमध्ये लाँच करणार दोन स्मार्ट टीव्ही, डॉल्बी ऑडियोचे मिळेल सपोर्ट
आयटेल मार्चमध्ये लाँच करणार दोन स्मार्ट टीव्ही
Follow us on

नवी दिल्ली : स्मार्ट टीव्ही निर्माता कंपनी आयटेल(itel) लवकरच भारतात दोन नवीन स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे. लीक झालेल्या अहवालानुसार आयटेल भारतीय बाजारात 32 इंचाचे आणि 43 इंचाचे दोन टीव्ही लाँच करणार आहे. हे दोन्ही टीव्ही अँड्रॉईड टीव्ही असतील. लीक झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, आयटेलच्या या दोन्ही टीव्हीचे डिझाईन फ्रेमलेस असेल. याशिवाय यात अल्ट्रा ब्राईट डिस्प्ले आणि डॉल्बी ऑडिओ मिळेल. आयटेलच्या दोन्ही स्मार्ट टीव्हीची किंमत बजेटमध्ये असेल आणि मार्चअखेर या बाजारात आणण्यात येतील. तथापि, कंपनीने अद्याप दोन्ही अँड्रॉईड टीव्हीच्या लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. (ITel will launch two smart TVs in March, supported by Dolby Audio)

55 इंचाचा अॅड्राईड टीव्हीही आणणार

असे म्हटले जात आहे की, 32 इंचाचा आणि 43 इंचाचा टीव्ही लॉन्च झाल्यानंतर कंपनी 55 इंचाची अँड्रॉईड टीव्हीसुद्धा बाजारात आणणार आहे. आयटेलचा हा आगामी टीव्ही एमआय टीव्ही, रिअॅलिटी टीव्ही आणि टीसीएल टीव्हीशी स्पर्धा करेल. या सर्व टीव्हीला गुगल प्ले स्टोरचे सपोर्ट मिळेल, याचा अर्थ असा की आपण कोणतेही ओटीटी अ‍ॅप सहज डाऊनलोड करू शकता.

ऑक्टोबरमध्ये काही टीव्ही केल्या होत्या लाँच

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयटेलने एकाच वेळी 32 इंच ते 55 इंचाच्या काही टीव्ही लाँच केल्या होत्या. यात Itel I5514IE 4K अल्ट्रा एचडी फ्रेमलेस टीव्ही आहे. या टीव्हीचे कॉन्ट्रास्ट रेश्यो 4000: 1 आहे. 55 इंचाच्या टीव्हीची किंमत 36,499 रुपये आहे. बिल्ड क्वालिटी पाहिले तर पॅनेल ए-प्लस ग्रेडचे आहे. टीव्हीचा डिस्प्लेचा रीफ्रेश दर 60 हर्ट्ज आहे. पिक्चर मोड स्टँडर्ड, डायनॅमिक, मुव्ही, युजर आणि पॉवर सेव्हिंगसारखे पर्याय ऑफर करतो.

डॉल्बी ऑडिओसह 20 डब्ल्यू स्पीकर

टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 20 डब्ल्यू स्पीकर आहे. चित्रपट, संगीत आणि ऑडिओसाठी बरेच पर्याय आहेत आणि वापरताना यातील फरक जाणवू शकतो. टीव्हीमध्ये 64 बिट 1.0 गीगाहर्ट्झ क्वाड कोर ए 53 प्रोसेसर, 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज आहे. हा अ‍ॅन्ड्रॉईड टीव्ही आहे परंतु यास गुगल प्ले स्टोरचे सपोर्ट नाही म्हणजेच आपण प्ले-स्टोअर वरून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करू शकत नाही. यात युट्युब, नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम सारखे काही अॅप प्री-इन्स्टॉल अ‍ॅप्स आहेत. (ITel will launch two smart TVs in March, supported by Dolby Audio)

इतर बातम्या

सिगारेट तस्करी रॅकेट उघडकीस, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरपीएफ जवानांची कारवाई

एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच