Vi आणि Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये Jio Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध, जाणून घ्या नवीन योजना
VI आणि Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. ज्यामध्ये तुम्ही क्रिकेटचे सामने, प्रीमियम कंटेंट, वेब सिरीज आणि चित्रपटांचे लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त VI आणि Jio च्या या प्लॅनवर जा.

Disney+ Hotstar आणि JioCinema हे प्लॅटफॉर्म एकत्र घेत Jio Hotstar हा ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. युजर जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट आता एकाच ठिकाणी पाहू शकणार आहेत. त्यामुळे जिओ हॉटस्टार हा खास ओटीटी प्लॅटफॉर्म ठरलेला आहे. पण यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे युजरला त्यांचा प्लॅन संपेपर्यंत त्यांच्या मेंबरशिपचा आनंद घेता येणार आहे. अशा परिस्थितीत जिओ आणि व्होडाफोन आयडियाने त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी आधीच नवीन योजना लाँच केल्या आहेत. ज्यामध्ये JioHotstar चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध केले गेले आहे. जर तुम्हीही या महिन्याच्या अखेरीस रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर हे प्लॅन तुमच्यासाठी आहेत. या योजना तुम्हाला नवीन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मोफत कंटेंट पाहण्याची परवानगी देत आहेत.
जिओच्या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार उपलब्ध
रिलायन्स जिओने त्यांच्या पहिल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओ सिनेमाचा मोफत वापर करण्याची सुविधा दिली आहे. तुम्हाला जिओच्या दोन प्लॅनमध्ये जिओ सिनेमा पाहता येईल. या दोन्ही प्लॅनपैकी 195 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यात प्लॅनमध्ये ग्राहकांना क्रिकेट डेटा पॅक मिळत आहे जो तीन महिन्यांसाठी मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन देत आहे. डेटा-ओन्ली ॲड-ऑन प्लॅनमध्ये 15GB 4G/5G डेटा येतो आणि तुम्हाला अॅड्ससह JioHotstar मोबाइल प्लॅनचा अनुभव घेता येणार आहे. हे तुम्हाला एका वेळी एकाच डिव्हाइसवर HD रिझोल्यूशनमध्ये कंटेंट स्ट्रीम करण्याची परवानगी देत आहे.
जिओच्या 949 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये ग्राहकांना 2GB 4G डेटासह, अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100 SMSआणि अमर्यादित 5G डेटा देते. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळत आहे.
व्होडाफोन आयडिया जिओ हॉटस्टार प्लॅन
तुम्हाला व्होडाफोन आयडिया प्रीपेड प्लॅनमध्ये JioHotstar सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जर तुमच्याकडे आधीच अॅक्टिव्ह बेस प्लॅन असेल तर तुम्ही 151 रुपयांचा ॲड-ऑन प्लॅन घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 4 gb डेटा आणि 30 दिवसांची वैधता मिळत आहे. तसेच तुम्हाला 3 महिन्यांचे JioHotstar सबस्क्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे.
त्यासोबतच 469 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS मिळणार आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, या अॅड-ऑन प्लॅनमध्ये 3 महिन्यांचे मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.
लक्षात ठेवा की जर तुमच्या अॅक्टिव्ह प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार असेल तर त्यात मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन आधीच मिळणार आहे. पण जर तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन वेगळा घ्यायचा असेल तर तुम्ही ॲड-ऑन प्लॅन घेऊ शकता.
