पाकिस्तानात iPhone 16e ची किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का, अंदाज देखील ठरेल चुकीचा
ॲपलने काही दिवसांपूर्वीच भारतासह जागतिक स्तरावर iPhone 16e हँडसेट लाँच केला आहे. त्यांच्या बेस व्हेरिएंटची किंमत भारतामध्ये 59,900 रुपये आहे. पण पाकिस्तानमध्ये ते वेगळ्या किमतीला विकले जात आहे. ही किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचक्कीत व्हाल.

आपण पाहतोच की भारत आणि पाकिस्तान वेगळे झाल्यापासून पाकिस्तान प्रत्येक क्षेत्रात भारताशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरी गोष्ट ही आहे की पाकिस्तानला भारताच्या पातळीवर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. दोन्ही देशांमध्ये अनेक भौगोलिक समानता असूनही त्यांच्या बाजारपेठेत आणि किमतीत खूप फरक आहे. अॅपलने १९ फेब्रुवारी रोजी भारतासह संपूर्ण जगासाठी त्यांचा नवीन हँडसेट iPhone 16e लाँच केला आहे. iPhone 16e च्या बेस मॉडेलची भारतामध्ये एकूण किंमत 59, 900रुपये आहे.
पण तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानमध्ये या फोनची किंमत थोडी वेगळी आहे. पाकिस्तानमध्ये ॲपलच्या नवीनतम आयफोन मॉडेल iPhone 16e ची किंमत किती आहे हे सांगण्यापूर्वी, तुम्ही हे जाणून घ्या की पाकिस्तानमध्ये त्यांच्या चलनात रुपया देखील वापरला जातो. आता आम्ही तुम्हाला सांगतो की ॲपलचा हा बजेट फ्रेंडली फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला पाकिस्तानमध्ये किती पैसे खर्च करावे लागतील.
iPhone 16e भारतातील किंमत
iPhone 16e ची भारतात तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले ज्यात 128 जीबी, 256 जीबी आणि 512जीबी. या सर्व व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅम कंपनीकडून देण्यात आलेली आहे. 128 जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत भारतात 59,900 रुपये आहे. तर 256 जीबी मॉडेलची किंमत 69,900 रुपये आहे. तर 512 जीबी मॉडेलसाठी तुम्हाला 89,900 रुपये खर्च करावे लागतील.
पाकिस्तानमध्ये iPhone 16e ची किंमत
पाकिस्तानमध्ये iPhone 16e ची किंमत थोडी वेगळी आहे. बेस व्हेरिएंटसाठी तुम्हाला सुमारे 1,67,000 पाकिस्तानी रुपये खर्च करून खरेदी करावा लागेल. काय मग किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले ना? पाकिस्तानमध्ये आयफोनची किंमत भारतापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. 256 जीबी व्हेरिएंटसाठी तुम्हाला 1,95,000 रुपयांना खरेदी करावा लागेल आणि जर तुम्ही टॉप-टियर 512 जीबी मॉडेल निवडले तर तुम्हाला सुमारे 2,51,000 रुपये खर्च करून खरेदी करावा लागेल. पाकिस्तानमध्ये आयफोनच्या किमतीत एवढी वाढ होण्यामागील कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे घसरते मूल्य, ज्यामुळे ते भारतातील किमतींपेक्षा खूपच महाग झाले आहे.
