दमदार फीचर्ससह JioPhone Next सज्ज, कसा असेल सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन, जाणून घ्या लाँच डेट, प्राईस आणि सर्वकाही

रिपोर्टनुसार, कंपनी दोन जिओफोन नेक्स्ट मॉडेल आणणार आहे. एक बेसिक जिओफोन नेक्स्ट असेल ज्याची किंमत 5000 रुपये असेल, तर दुसरीकडे जिओफोन नेक्स्ट अॅडव्हान्स असेल ज्याची किंमत 7000 रुपये असेल.

दमदार फीचर्ससह JioPhone Next सज्ज, कसा असेल सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन, जाणून घ्या लाँच डेट, प्राईस आणि सर्वकाही
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 3:50 PM

मुंबई : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही प्रामुख्याने एक टेलिकॉम कंपनी आहे जी काही वर्षांपूर्वीच या क्षेत्रात उतरली आहे. अगदी कमी वेळात जिओ देशातील सर्वोत्तम आणि लोकप्रिय टेलिकॉम कंपनी बनली आहे. 2017 मध्ये, जिओ फोन उत्पादनाच्या क्षेत्रात उतरली आणि गेल्या साडेतीन वर्षात जिओने कमी बजेट आणि चांगल्या फीचर्सचे मोबाईल फोन लाँच केले. जिओचा पुढचा स्मार्टफोन, जिओफोन नेक्स्ट हासुद्धा असाच एक जबरदस्त असणार फोन आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या वैशिष्ट्यांविषयी आणि हा फोन कधी लाँच होणार आहे? (JioPhone Next : Find out about cheapest 4G smartphone, launch date, price and specs)

Reliance Jio परवडणारा आणि गुगल बॅक्ड स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट (JioPhone Next) लवकरच लॉन्च होणार आहे. हा फोन 10 सप्टेंबर रोजी रिलीजसाठी सेट आहे, जिओफोन नेक्स्ट हा तुम्ही बाजारात पाहात असलेल्या बहुतेक सर्वच स्मार्टफोनपेक्षा अधिक परवडणारा स्मार्टफोन असणार आहे. परंतु, जिओफोन नेक्स्टच्या नियमित खरेदी व्यतिरिक्त, कंपनी लोकांना विविध पर्याय देऊ इच्छिते जे विस्तृत सेल्स स्ट्रक्चरप्रमाणे आहे. त्यापैकी एक म्हणजे जिओ फोन नेक्स्ट, जो 500 रुपयांत खरेदी करता येईल, परंतु इथे एक अडचण आहे.

ईटी नाऊच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ अनेक भारतीय बँका आणि कर्ज देणाऱ्या भागीदारांसोबत भागीदारी करून विविध पेमेंट मोडद्वारे जिओफोन नेक्स्ट विकणार आहे. टेलिकॉम कंपनी स्टेट बँक ऑफ इंडिया, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट अॅश्योर आणि डीएमआय फायनान्स यांच्यासोबत कोलाबोरेट करू शकते. कंपनीने जे लक्ष्य ठेवले आहे की, ते पुढील 6 महिन्यांत 50 मिलियन युनिट्सची विक्री करून 10,000 कोटी पर्यंतचा व्यवसाय करणार आहेत.

JioPhone हे ईजी सेल्स मॉडल असेल. तथापि, येथे आपल्याला रेग्युलर वन टाइम पेमेंट ऑप्शन मिळेल. पण रिलायन्स जिओला ग्राहकाने कोणत्याही किंमतीत फोन खरेदी करावा असे वाटते. यासाठी जिओ सुरुवातीला ग्राहकांकडून पूर्ण पैसे घेणार नाही.

जियोफोन नेक्स्ट आणि सेल

रिपोर्टनुसार, कंपनी दोन जिओफोन नेक्स्ट मॉडेल आणणार आहे. एक बेसिक जिओफोन नेक्स्ट असेल ज्याची किंमत 5000 रुपये असेल, तर दुसरीकडे जिओफोन नेक्स्ट अॅडव्हान्स असेल ज्याची किंमत 7000 रुपये असेल. ग्राहकाला कोणताही फोन खरेदी करायचा असेल तर त्यांना संपूर्ण किंमत मोजावी लागणार नाही. ते संपूर्ण रकमेच्या केवळ 10 टक्के म्हणजेच 500 रुपये देऊन बेसिक मॉडेल आणि अॅडव्हान्स मॉडेल खरेदी करू शकतात. यानंतर, त्यांना उरलेले पैसे बँक आणि कर्ज देणाऱ्या भागीदाराला द्यावे लागतील. येथे हे स्पष्ट आहे की, तुम्हाला हा फोन हप्त्यांमध्ये घ्यावा लागेल.

रिलायन्स जिओने एनबीएफसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांशी भागीदारी केली आहे. अशा परिस्थितीत जर ग्राहकाने फोन खरेदी केला तर त्याला थोडी जास्त रक्कम मोजावी लागेल. म्हणजेच 5000 रुपये किंमतीचा फोन ईएमआय लागू केल्यानंतर अधिक किमतीचा असेल. मात्र, ही रक्कम किती असेल आणि फोनची मूळ किंमत किती असेल, याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल जी अँड्रॉइड 11 वर आधारित असेल. अँड्रॉइड गोच्या मदतीने ग्राहक अँड्रॉइड फोनच्या मूलभूत अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. येथे त्यांना गुगलच्या सर्व्हिसचाही अॅक्सेस मिळेल, ज्याद्वारे सॉफ्टवेअर अपडेट, गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी मिळेल. युजर्स या फोनमध्ये सर्व लोकप्रिय गेम डाउनलोड करण्यास सक्षम असतील.

कोणते फीचर्स मिळणार?

जिओ फोन नेक्स्टमध्ये क्वालकॉम द्वारे लो एंड चिपसेट देण्यात येईल. रहमान यांच्या ट्विटनुसार, डिव्हाइसमध्ये क्वालकॉम QM215 प्लॅटफॉर्म दिला जाईल. यात 64 बिट CPU आणि ड्युअल ISP सपोर्ट असेल. फोनमध्ये 2 जीबीपेक्षा कमी रॅम देण्यात येईल. त्याच वेळी, स्टोरेजच्या बाबतीत, त्यात 32 जीबी आणि 64 जीबी असे दोन पर्याय मिळू शकतात. याशिवाय यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटचा पर्यायही दिला जाईल.

इतर स्पेक्स

डिव्हाइसमध्ये 5.5 इंच आणि 6 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. रिझोल्यूशनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 1440 * 720 पिक्सलचे HD रिझोल्यूशन दिले जाईल. बॅटरीबद्दल माहिती मिळालेली नाही, परंतु या फोनची बॅटरी 3000 ते 4000mAh च्या दरम्यान असू शकते. त्याचबरोबर फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट दिला जाईल. फोनमध्ये वायफाय आणि ब्लूटूथ सपोर्टही दिला जाईल. त्याचबरोबर फोनची किंमत 3500 रुपयांच्या आसपास असू शकते.

इतर बातम्या

कमी किंमत आणि 6000mAh बॅटरीसह Redmi 10 Prime भारतात लाँच

Samsung Galaxy M32 5G बाजारात, आजपासून सेल सुरु, जाणून घ्या किती आहे 5G फोनची किंमत

वर्षअखेरीस Samsung सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

(JioPhone Next : Find out about cheapest 4G smartphone, launch date, price and specs)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.