जिओचा आणखी एक धमाका, मुकेश अंबानी यांनी वाढवलं Apple, Google चं टेन्शन, अमेरिकेच्या कपन्यांना ही धास्ती

जिओच्या ग्राहकांसाठी जिओने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांच्या या घोषणेमुळे गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्टच्या चिंता वाढल्या आहेत. भारतीय बाजारात ही एक मोठी गेमचेंजर घोषणा आहे. यामुळे जिओच्या सर्वच ग्राहकांना ही सेवा मिळणार आहे. ज्यासाठी सध्यातरी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीयेत.

जिओचा आणखी एक धमाका, मुकेश अंबानी यांनी वाढवलं Apple, Google चं टेन्शन, अमेरिकेच्या कपन्यांना ही धास्ती
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 3:36 PM

रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेमुळे तिकडे ॲपल आणि गुगलचे ही टेन्शन वाढले आहे. मायक्रोसॉफ्टला ही चिंता चतावतेय. रिलायन्स जिओ आता आपल्या ग्राहकांना 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज देणार आहे. त्यामुळेच Google One आणि iCloud च्या वर्चस्वाला अंबानी यांनी थेट आव्हान दिले आहे. आतापर्यंत क्लाउड स्टोरेजवर फक्त गुगल आणि ॲपलचेच वर्चस्व होते. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या वनड्राईव्हचाही समावेश होता. तज्ञांनी याबाबत बोलताना सांगितले की, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांसाठी जिओचे हे मोठे आव्हान असणार आहे. कारण येत्या काळात यामुळे बाजारात मोठे बदल दिसून येणार आहेत.

जिओचा आणखी एक धमाका

जिओने बाजारात एन्ट्री करताच अनेक लहान कंपन्या बंद झाल्या आहेत. कारण त्या जिओसोबत स्पर्धाच करु शकल्या नाहीत. दुसरीकडे आता Google One मध्ये 100 GB स्टोरेज खरेदी करण्यासाठी 130 रुपये द्यावे लागतात, तर Apple iCloud मध्ये 50 GB साठी 75 रुपये द्यावे लागतात. असं असताना मुकेश अंबानी यांनी क्लाउड सेवा सुरू करण्याची घोषणा केल्याने हा त्यांचा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटले जात आहे.

100 जीबी मोफत स्टोरेज

तज्ज्ञ सांगतात की, जिओच्या या निर्णयाचा मोठा फायदा यूजर्सना होणार आहे. कारण आतापर्यंत अशी सेवा कोणत्याही भारतीय कंपनीकडून दिली जात नव्हती. जर 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज दिले तर युजर त्याचा भरपूर वापर करु शकणार आहेत. दुसरं म्हणजे जिओची सशुल्क सेवाही खूप स्वस्त असेल, यामुळे गुगल आणि ॲपललाही आता विचार करायला भाग पडेल की ते आपले वर्चस्व कसे कायम राखू शकतील.

जिओची सेवा कधी सुरू होणार?

Jio कडून ही सेवा कधी सुरू होत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. Jio आपल्या ग्राहकांना दिवाळीपासून ही खास ऑफर देणार आहे. युजर क्लाउड स्टोरेजमध्ये काहीही सेव्ह करुन ठेवू शकता. जसे की फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आणि इतर डिजिटल सामग्रीचा समावेश असेल.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.