Koo App चा बदलला लूक, युजर्सना घेता येणार ब्राऊजिंगचा खास अनुभव

मागच्या आवृत्तीच्या तुलनेत हे एक महत्त्वाचे अपग्रेड आहे, ज्यात नव्या इंटरफेससह सहजपणे नेव्हिगेशन करता येते. यातून यूजर्सना (App users) एक उत्कृष्ट आणि रिअल टाइम अनुभव मिळतो. सोबतच यातून तुम्हाला सोशल मीडियाच्या दुनियेत तुम्हाला आगळ्या विचारांची व्यक्ती म्हणून ठसा उमटवण्याची संधी मिळते.

Koo App चा बदलला लूक, युजर्सना घेता येणार ब्राऊजिंगचा खास अनुभव
Koo App चा बदलला लूकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 5:42 PM

क्रिएटर्सना अधिकाधिक महत्त्व आणि वेगवान अनुभव देण्यासाठी बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’ ॲपने (Koo App) एक खास गोष्ट आणली आहे. iOS आणि ॲन्ड्रॉइड दोन्ही डिव्हाइसेसवर आपल्या यूजर्ससाठी ब्राउझिंगचा (Browsing) एक उत्कृष्ट अनुभव ‘कू’ने सादर केला आहे. दिसायला आकर्षक, सहज आणि ज्याच्याशी लगोलग जोडून घेता येईल असं हे डिझाइन युजर्सला विशेष ध्यानात घेऊन बनवले गेले आहे. मागच्या आवृत्तीच्या तुलनेत हे एक महत्त्वाचे अपग्रेड आहे, ज्यात नव्या इंटरफेससह सहजपणे नेव्हिगेशन करता येते. यातून यूजर्सना (App users) एक उत्कृष्ट आणि रिअल टाइम अनुभव मिळतो. सोबतच यातून तुम्हाला सोशल मीडियाच्या दुनियेत तुम्हाला आगळ्या विचारांची व्यक्ती म्हणून ठसा उमटवण्याची संधी मिळते.

‘कू’ ॲपचा नवा ब्राउझिंग अनुभव सगळ्या यूझर इंटरफेसला खास बनवतो. ॲपच्या डावीकडची रिकामी जागा काढून टाकली आहे. यातून कंटेंट आता एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत नीटपणे पसरला आहे. यातून यूजर्सना त्यांच्या गरजेची माहिती पाहणं अगदीच सोपे झाले आहे. यात अनावश्यक कंटेंटही कमी केला गेला आहे. परिणामी ॲप अगदीच स्वच्छ दिसते. यूजर्सचा अनुभव खूप जास्त सहज आणि कसलाही अडथळा नसलेला बनतो.

‘कू’चे डिझाइन हेड, प्रियांक शर्मा म्हणाले, “यूजर्स आनंदी रहावे हाच आमच्या ब्रॅंडचा मुख्य हेतू असतो. विशेषकरून जेव्हा आमच्या यूजर इंटरफेसचा विषय येतो, तेव्हा आम्ही आपल्या यूजर्सना सर्वात उत्कृष्ट अनुभव देण्याबाबत सतत सजग असतो. या उत्कृष्ट ब्राउझिंग अनुभवाची सुरवात करून आम्ही एक चांगला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. याबाबत आम्हाला पूर्वीच कम्युनिटीकडून खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. कू ॲपवर उत्कृष्ट ब्राउझिंग अनुभव सादर करण्याच्या दिशेने केलेली ही केवळ सुरवात आहे.”

सध्या ‘कू’ युजर्सना मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड़, तमिल, बंगाली, असमिया, तेलुगू, पंजाबी आणि इंग्रजीत आपले विचार व्यक्त करण्याची संधी देतो. प्लॅटफॉर्म स्मार्ट फीचर्स लॉन्च करण्यासाठी सतत काम करतो. यातून यूजर्सच्या अनुभवांचा दर्जा वाढतो आणि त्यांना प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक आनंद घेता येतो. ‘कू’ने डार्क मोड, टॉक-टू-टाइप, चॅट रूम, लाइव्ह ही काही प्रमुख फीचर्स नुकतीच लॉन्च केली आहेत.

काय आहे कू?

‘कू’ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमधला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. सध्या Koo मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ, आसामी, पंजाबी आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. ‘कू’च्या अनोख्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे भाषांतर सुविधा. मूळ मजकुरातली भावना आणि संदर्भ जसेच्या तसे राखत युजर्सना त्यांचा संदेश विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून पाठवण्याची रिअल टाइम सुविधा देते. नुकताच ‘कू’ने 3 कोटींहून अधिक डाउनलोड्सचा टप्पा गाठला आहे. राजकारण, क्रीडा, माध्यम, कला, अध्यात्म या क्षेत्रातील 7 हजारांहून जास्त दिग्गज Koo च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नियमित संवाद साधत असतात.

Non Stop LIVE Update
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.