Android युझर्ससाठी मायक्रोसॉफ्ट आउटलुक लाइट ‘या’ तारखेपासून बंद
मायक्रोसॉफ्ट कंपनीने जाहीर केले आहे की मोबाईल ईमेल सेवांचे एकत्रीकरण करत असल्याने अँड्रॉइडसाठीचे आउटलुक लाइट ॲप लवकरच काम करणे बंद करणार आहे. चला तर कोणत्या तारखेपासून आउटलुक बंद होईल ते जाणून घेऊयात.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने जाहीर केले आहे की अँड्रॉइडसाठीचे आउटलुक लाइट ॲप बंद होणार आहे. कमी पॉवरचे डिव्हाइस वापरणाऱ्यांसाठी तयार केलेल्या या लाइटवेट ईमेल ॲपचा मेलबॉक्स ॲक्सेस लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक फिचर्स असलेल्या आउटलुक मोबाईल ॲपवर स्विच करावे लागेल.
या तारखेपासून ॲप बंद राहील
निओविनच्या एका अहवालानुसार 25 मे 2026 नंतर हे ॲप अँड्रॉइड मोबाईलमध्ये काम करणार नाही. या तारखेनंतर तुम्ही ॲप उघडू शकाल पण तुम्हाला ईमेल, कॅलेंडर किंवा अटॅचमेंट्स ॲक्सेस करता येणार नाहीत. अधिक वापरकर्त्यांना हे ॲप वापरण्यापासून रोखण्यासाठी, मायक्रोसॉफ्टने 6 ऑक्टोबर 2025 पासून आउटलुक लाइटच्या नवीन डाउनलोडवर आधीच बंदी घातली होती. अहवालात म्हटले आहे की, मायक्रोसॉफ्टने अँड्रॉइडवरील आउटलुक लाइट बंद करण्यासाठी तारीख आधीच निश्चित करण्यात आली आहे.कारण कंपनीचे लक्ष आता वैशिष्ट्यपूर्ण आउटलुक मोबाईलवर केंद्रित करत आहे.
तुमच्यावर काय परिणाम होईल?
आउटलुक लाइट हे एंट्री-लेव्हल स्मार्टफोन किंवा मर्यादित नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेल्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी डिझाइन केले होते. मात्र मायक्रोसॉफ्ट आता त्यांच्या मोबाईल सेवांना आउटलुक मोबाईलच्या माध्यमातून एकत्रित करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ते अधिक मेलबॉक्स सपोर्ट आणि फिचर्स प्रदान करते. Outlook Mobile ॲपचे Microsoft 365 सर्विससोबत अधिक सखोल इंटीग्रेशन देखील आहे.
तुम्ही हे ॲप वापरत असाल तर तुमच्या ईमेल आणि कॅलेंडर आयटम्सवर सहज प्रवेश कायम ठेवण्यासाठी तुम्ही आउटलुक मोबाईलमध्ये स्विच व्हावे अशी शिफारस केली जाते. मायक्रोसॉफ्ट आउटलुक लाइटमधील ‘अपग्रेड’ पर्याय वापरण्याची शिफारस करते, जो वापरकर्त्यांना आउटलुक मोबाईल डाउनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर निर्देशित करतो. याव्यतिरिक्त वापरकर्ते मॅन्युअली ॲप इन्स्टॉल करून आणि त्यांच्या विद्यमान खात्यासह साइन इन करून सर्व डेटावर पुन्हा प्रवेश मिळवू शकतात. मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार वापरकर्ते आउटलुक मोबाईलवर त्यांचे सर्व ईमेल, कॅलेंडर आयटम्स आणि अटॅचमेंट्स ॲक्सेस करू शकतील.