AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे तुमचा नंबर… 82 वर्षांच्या वृद्धेला धमकावत…

कल्याणमध्ये ८२ वर्षीय वृद्ध महिलेची लाखाोची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा बहाणा करत 'डिजिटल अरेस्ट'द्वारे सायबर गुन्हेगारांनी ही लूट केली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे नंबर असल्याचे सांगून महिलेला मानसिक दबाव टाकून बँक खात्यातील पैसे काढण्यास भाग पाडले. कल्याण पोलीस या गंभीर प्रकरणाचा तपास करत आहेत.

Kalyan Crime : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याकडे तुमचा नंबर... 82 वर्षांच्या वृद्धेला धमकावत...
डिजीटल अरेस्ट
| Updated on: Apr 15, 2026 | 8:13 AM
Share

साधारण वर्षभरापूर्वी काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर दहशवाद्यांनी हल्ला करत अनेक पुरुषांचे जीव घेतले. या हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या असून त्यामुळे अख्खा देश हादरला होता. या हल्ल्यामुळे नागिरकांच्या मनात प्रचंड दहशत, भीती होती. मात्र याच घटनेचा संदर्भ देत , गैरफायदा घेऊन एका वृद्ध महिलेची फसवमूक करत तिला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. पहलगाममध्ये ज्या पाकिस्तानी दहशतवाद्याने भारतीय पर्यटकांवर हल्ला केला, त्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक आहे, असं म्हणत 82 वर्षांच्या आजीला घाबरवलं आणि त्यांन डिजीटल अरेस्ट करत 5 दिवसांच्या कालावधीत एकूण 73 लाखांची लूट करण्यात आल्याचा बयानक प्रकार कल्याणमध्ये घडल्याचे उघडकीस आलं. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे

दहशतवाद्यांकडे तुमचा नंबर, तपास अधिकारी बनून आजींची केली फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली महिला 82 वर्षांची वृद्धा असून त्या कल्याण पश्चिम येथील सिंडिकेट मुरबाड रोडवरील एका इमारतीमध्ये राहतात. या महिन्याच्या सुरुवातीलच 6 ते 10 एप्रिलच्या काळात त्यांची फसवणूक करत लाखो रुपये उकळण्यात आले. पहलगाममध्ये ज्याने दहशतवादी हल्ला केला त्याच्याकडे तुमचा नंबर आहे, त्याने पैशांचे काही संशयास्पद व्यवहार केलेत, त्यामुळे तुमचाही यात सहभाग आहे. तुमचे बँक व्यवहार आम्हाला तपासायचे आहेत, असं सांगून 5 दिवस त्यांना डिजीटल अरेस्ट करत 73 लाख त्यांच्याकडून लुटले.

त्या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, 6 एप्रिल रोजी त्या घरी असताना विजय खन्ना नावाच्या माणसाने त्यांना फोन केला. मोबाईलवर संपर्क साधत तो व त्याचे साथीदार आळीपाळीने मला फोन करत होते, आपण तपास अधिकारी आहोत असं सांगत त्यांनी मला घाबरवलं, असा दावा महिलेने केला.

पहलगाममध्ये ज्या पाकिस्तानी दहशतवाद्याने भारतीय पर्यटकांवर हल्ला केला, त्याच्याकडे तुमचा मोबाईल क्रमांक म्हणत त्यांनी मला घाबरवलं. पाच दिवस सतत फोन करून मानसिक दबाव वाढवत‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव रचून बँक व्यवहार तपासणीचा बहाणा केला. RTGS व ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे 73.30 लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकलत त्यांनी त्या आजीला गंडा घातला. ‘तपास अधिकारी’ बनून पाच सायबर भामट्यांची सुनियोजित कट रजच आजींची फसवणूक केली. अखेर आपली फसवणूक जाल्याचं लक्षात आल्यावर त्या आजींनी कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्यात दाव घेत तक्रार नोंदवली. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणातील आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!