Mobile Restart: फोन रिस्टार्ट करण्याचे अनेक फायदे; वर्षानुवर्षे मोबाईल वापरणाऱ्यांना नाही माहिती
Smartphone Reboot: अनेकदा मोबाईल डोकं फिरल्यासारखं वागतो. एक फीचर उघडायला जावं तर दुसरंच उघडतं. मग अशावेळी अनेक जण डोक्याला फारसा ताण न घेता सरळ मोबाईल रिबूट अथवा रिस्टार्ट करतात. काय होतो त्याने फायदा? तुम्हाला माहिती आहे का?

Smartphone Tips in Marathi : मोबाईल फोन तर आता प्रत्येकाच्या खिशात आहेत. स्मार्टफोन, हटके फीचर्स असलेले विविध फोनने बाजार फुलला आहे. पण सतत मोबाईलवर पडीक असणाऱ्या अनेकांना फोनच्या रीस्टार्ट बटणाचा फायदा काय आहे हे मात्र माहिती नसते. फोन रीस्टार्ट करण्याचा एक वा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. त्यामुळे फोनची कामगिरीच सुधारत नाही, तर इतर ही अनेक फंक्शन व्यवस्थित काम करतात. जसा आपल्याला कामातून ब्रेक घ्यावा वाटतो. एक दिवसाची सुट्टी हवी असते. अगदी तसेच तुमच्या मोबाईलला सुद्धा हक्काचा ब्रेक घ्यावासा वाटतो.
गती आणि कामगिरीत सुधारणा
फोन रीस्टार्ट केल्याने रॅम स्वच्छ होते. त्यातील कचरा कमी होतो. फोन रीस्टार्ट केल्याने रॅममधील अनावश्यक साचलेल्या अनेक फाईल्सचा कचरा निघून जातो. ॲप जरी बंद असले तरी हे ॲप बॅकग्राऊंडमध्ये सुरूच असतात. त्यामुळे फोनची रॅम सतत भरत असते. फोनची गती मंदावते. फोन रीस्टार्ट झाल्यावर रॅममध्ये ज्या गोष्टी बॅकग्राऊंडला सुरू असतात. त्या सर्व बंद होतात. फोनचा स्पीड आणि परफॉर्मेन्स सुधारतो.
कनेक्टिव्हिटीची समस्या दूर
जर वाय-फाय, ब्लूटूथ अथवा सेल्यूलर डेटा कनेक्टिव्हिटीची अडचण येत असेल तर लागलीच फोन रीस्टार्ट करा. ही अडचण दूर होईल. वायफाय ऑन असले तरी अनेकदा इंटरनेट येत नाही. अशावेळी फोन रीस्टार्ट मोडवर टाकल्यावर ही समस्या दूर होते. नव्यान दमाने इंटरनेट जोरात पळते. तर मोबाईलचे इंटरनेट काम करत नसेल तर अनेक जण स्मार्टफोन रिबूटचा पर्याय निवडतात. त्यामुळे इंटरनेटची समस्या चुटकीसरशी दूर होते.
मोबाईल फोन हँग होण्याची अडचण दूर
जर फोन सतत हँग होत असेल तर फोन रीस्टार्ट करणे फायद्याचे ठरे. यामुळे फोनच्या अंतर्गत असलेल्या फाईल्स गायब होतात आणि फोनवरील ताण, भार कमी होतो. जर फोन सतत हँग होत असेल तर एक दोनदा रिबूट करून पाहा. ही अडचणी सुटू शकते. एकंदरीत पाहाता फोन रीस्टार्ट केल्यास मेमरी रिफ्रेश होते. ॲपमधील गडबड दूर होतात. तर फोनच्या सिस्टीममधील काही समस्याही दूर होतात.
