AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून PUBG Mobile च्या 20 लाख अकाऊंट्सवर बंदी

PUBG मोबाइल पब्लिशर टॅन्सेंट होल्डिंग्सने घोषणा केली आहे की, त्यांनी गेल्या आठवड्यात 2 मिलियन अकाऊंट्सवर (20 लाख अकाउंट्स) कायमस्वरुपी बंदी घातली आहे.

...म्हणून PUBG Mobile च्या 20 लाख अकाऊंट्सवर बंदी
| Updated on: Dec 21, 2020 | 6:09 PM
Share

मुंबई : PUBG मोबाइल पब्लिशर टॅन्सेंट होल्डिंग्सने घोषणा केली आहे की, त्यांनी गेल्या आठवड्यात 2 मिलियन अकाऊंट्सवर (20 लाख अकाउंट्स) बंदी घातली आहे. कंपनीने ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत चिटिंग आणि हॅक्सचा वापर करणाऱ्या 20 लाख अकाऊंट्सवर आम्ही कारवाई केली आहे. हे सर्व अकाऊंट्स आम्ही पूर्णपणे बॅन केले आहेत. (More than 2 Million Pubg Mobile accounts were banned last week)

कंपनीने बॅन केलेल्या 2 मिलियन अकाऊंट्सपैकी 31 टक्के युजर्सनी त्यांचं कॅरेक्टर मॉडेल मॉडिफाय केलं होतं, तर 18 टक्के युजर्स असे होते ज्यांनी X-ray व्हिजन चीट्सचा वापर केला होता. तसेच ऐम हॅक्स, स्पीड हॅक्स आणि एरिया ऑफ डॅमेज मॉडिफाय करणाऱ्या हॅक्सचा वापर केल्याबद्दल कंपनीने ही कारवाई केली आहे. बॅन केलेल्या अकाऊंट्सपैकी एक चतुर्थांश अकाऊंट्स ब्रॉन्झ टीयरवाले होते. तर डायमंड टीयर आणि प्लॅटिनम टीयरवाले अकाऊंट्स क्रमशः 17 आणि 15 टक्के होते. यापूर्वी कंपनीने ऑगस्टमध्येदेखील असेच काही अकाऊंट्स बॅन केले होते. तसेच त्यावेळी काही स्पेसिफिक डिव्हाइसमध्ये गेम खेळण्यावर बंदी घातली होती.

PUBG Mobile India पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता

तीन महिन्यांपूर्वी भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनला मोठा झटका देत PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची पबजी गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. हा गेम डिसेंबर महिन्यात भारतात लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप गेम लाँच करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील वर्षी हा गेम लाँच होईल, अशी चर्चा आहे.

PUBG Mobile In ला सरकारकडून अप्रूव्हल

मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारने PUBG Mobile India या गेमला अप्रूव्ह केलं आहे. PUBG Mobile India Private Ltd. या नावाने हा गेम भारतात रजिस्टर केला आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट अफेयर्सच्या वेबसाईटवर हा गेम CIN सह रजिस्टर करण्यात आला आहे. हा गेम केवळ भारतीयांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावेळी PUBG Corporation चिनी कंपनी Tenncent सोबत कोणतीही भागिदारी करणार नाही.

PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

PUBG च्या पॅरेंट कंपनीची भारतात मोठी गुंतवणूक

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या 

लाँचिंगपूर्वीच FAU-G चा रेकॉर्ड, 10 लाखांहून अधिक युजर्सकडून गेमसाठी रजिस्ट्रेशन

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

(More than 2 Million Pubg Mobile accounts were banned last week)

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....