AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10000 रुपयांच्या रेंजमध्ये 50MP कॅमेरा स्मार्टफोन, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

रेडमी-शाओमीनंतर (Redmi-Xiaomi) मोटोरोला ही जगातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. आता मोटोरोला (Motorola) एकामागून एक मजबूत आणि स्वस्त फोन लॉन्च करत आहे.

10000 रुपयांच्या रेंजमध्ये 50MP कॅमेरा स्मार्टफोन, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील
Moto G22 IndiaImage Credit source: Motorola
| Updated on: Apr 11, 2022 | 11:27 AM
Share

मुंबई : रेडमी-शाओमीनंतर (Redmi-Xiaomi) मोटोरोला ही जगातील आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे. आता मोटोरोला (Motorola) एकामागून एक मजबूत आणि स्वस्त फोन लॉन्च करत आहे. Motorola ने नुकताच आपला मोटो जी 22 इंडिया (Moto G22 India) स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. अतिशय कमी किमतीत चांगल्या फीचर्ससह सादर करण्यात आलेल्या या फोनवर सूटदेखील दिली जात आहे. Moto G22 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. फोनचा सेल 13 एप्रिलपासून ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू होईल. जर तुम्ही हा फोन पहिल्याच दिवशी फ्लिपकार्टवरून खरेदी केला असेल, तर तुम्ही हा स्मार्टफोन एक्सक्लुझिव्ह लॉन्च ऑफर अंतर्गत 9,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

एक्सक्लुझिव्ह लॉन्च ऑफर फक्त 14 एप्रिलपर्यंत वैध आहे. तसेच, यासाठी तुम्हाला ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरावे लागेल. हा स्मार्टफोन ऑनलाइन खरेदी करताना नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे. Moto G22 मध्ये 6.5 इंचाचा IPS-LCD डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे आणि रिझोल्यूशन 1600×720 पिक्सेल आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89.03 टक्के आहे. या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 20W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. USB Type-C पोर्ट चार्जिंगसाठी उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे एवढ्या मोठ्या क्षमतेची बॅटरी असूनही हा स्मार्टफोन अतिशय पातळ आहे.

Moto G22 चा कॅमेरा आणि सेफ्टी फीचर्स

Motorola Moto G22 च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, तर यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. तसेच इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सल्सचे आहेत, जे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो लॉक केलेला स्मार्टफोन बायोमेट्रिक पद्धतीने अनलॉक करण्याचे काम करतो.

मोटो जी22 इंडियाचे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक, अॅम्बियंट लाइट सेन्सर, एक्सेलेरोमीटर सेन्सरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, जीपीएस आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकही देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G37 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये फक्त 4G LTE सिम कार्ड सपोर्ट असेल.

इतर बातम्या

गुगलने बंदी घातलेले ‘हे’ अॅप्स्‌ तुमच्या मोबाईलमध्ये नाहीत ना?

सोशल मीडियात खळबळ : हवामान खात्याचेही ट्विटर अकॉउंट हॅक

स्कूटर देतो पण, कामावर या… गुगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी आमिष

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.