AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Moto G51 लवकरच ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगपूर्वी स्पेसिफिकेशन लीक

भारत आणि जागतिक बाजारपेठेत नव्या स्मार्टफोनची सिरीज लाँच केल्यानंतर, मोटोरोला कंपनी लवकरच दुसरा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशी अपेक्षा आहे की, कंपनी नोव्हेंबरमध्ये मोटो जी 51 सादर करेल.

Moto G51 लवकरच ग्राहकांच्या भेटीला, लाँचिंगपूर्वी स्पेसिफिकेशन लीक
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 6:06 PM
Share

मुंबई : भारत आणि जागतिक बाजारपेठेत नव्या स्मार्टफोनची सिरीज लाँच केल्यानंतर, मोटोरोला कंपनी लवकरच दुसरा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशी अपेक्षा आहे की, कंपनी नोव्हेंबरमध्ये मोटो जी 51 सादर करेल. मोटो G51 चे खास फीचर्स एका वेबसाइटवर लीक झाले आहेत. या स्मार्टफोनला “सायप्रस 5 जी” असे कोडनेम देण्यात आले आहे आणि त्यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. (Moto G51 smartphone will launch in india in November, features leaked)

Technik News ने Moto G51 चे मुख्य स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. आगामी स्मार्टफोनचा मॉडेल क्रमांक XT2171-1 आहे आणि त्याचे कोडनेम सायप्रस जी आहे. स्मार्टफोन गीकबेंचवर देखील पाहायला मिळाला आहे. ऑगस्टच्या अखेरीस जागतिक स्तरावर लॉन्च झालेल्या Moto G50 5G मध्ये हा फोन अपग्रेड होण्याची शक्यता आहे. लीक्स सुचवतात की मोटोरोला क्वॉलकॉम प्रोसेसर वर स्विच करू शकते.

Motorola ने Moto G50 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरचा वापर केला होता. Lenovo ची मालकी असलेल्या कंपनीने नुकतेच Moto G40 आणि Moto G20 लाँच केले होते.

Moto G51 काय असेल खास?

  • मोटो G51 5G च्या कॅमेरा स्पेसिफिकेशनबद्दल खुलासा करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.
  • मोटो जी 51 मध्ये फुल-एचडी+ डिस्प्ले असू शकतो परंतु डिस्प्लेचा आकार अहवालात उघड करण्यात आलेला नाही. टेक्निक न्यूजने रिफ्रेश रेट जाहीर केला नाही परंतु असे म्हटले आहे की मोटोरोलाचा हा फोन नोव्हेंबरमध्ये लॉन्च होऊ शकते.
  • गीकबेंच लिस्टिंगने उघड केले आहे की, मोटो जी 51 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरद्वारे सपोर्टेड असू शकते. G50 5G ने Dimensity 700 SoC चा वापर केला आहे, परंतु चिप नसल्यामुळे, मोटोरोला कथितपणे Moto G51 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वापरेल.
  • हा स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या रॅम व्हेरिएंटसह लॉन्च केला जाऊ शकतो, ज्यात 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम व्हेरिएंटचा समावेश आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालणार आहे, परंतु तो अँड्रॉइड 12 मध्ये अपग्रेड केला जाऊ शकतो.
  • जर हा स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला तर स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

इतर बातम्या

स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी

दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं

(Moto G51 smartphone will launch in india in November, features leaked)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.