2.5K डिस्प्ले आणि 10200mAh बॅटरीसह भारतात Moto Pad 70 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
मोटो पॅड 70 भारतात दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये 2.5K डिस्प्ले, 10,200mAh बॅटरी, 68W चार्जिंग आणि डॉल्बी अॅटमॉससह क्वाड स्पीकर्स आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन अँड्रॉइड टॅब्लेट मोटो पॅड 70 लाँच केला आहे. या टॅब्लेटमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 12.1-इंचाचा 2.5K डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट आणि 68W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,200 क्षमतेची मोठी बॅटरी आहे. विशेष म्हणजे कंपनी या टॅब्लेटसोबत मोटो पेन आणि मोटो फोलिओ कीबोर्डदेखील देत आहे. कंपनीने अँड्रॉइड 18 पर्यंत ओएस अपडेट्स आणि 2030 पर्यंत सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. चला तर मग या मोटो पॅडची किंमत आणि उपलब्धता जाणून घेऊयात.
मोटो पॅड 70: किंमत आणि उपलब्धता
मोटो पॅड 70 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 33 हजार 999 रूपये आहे, तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 36 हजार 999 रूपये आहे. हा टॅबलेट 15 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा टॅबलेट पॅन्टोन सी एंजल या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. या टॅबलेटमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB किंवा 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे.
2.5 के डिस्प्ले आणि पॉवरफूल प्रोसेसर
मोटो पॅड 70 मध्ये 1,600×2,560 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 12.1-इंचाचा 2.5K IPS टचस्क्रीन डिस्प्ले आहे. ही स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट आणि 96 टक्के DCI-P3 कलर कव्हरेजला सपोर्ट करते. याची सामान्य ब्राइटनेस 600 निट्स आहे आणि HBM मोडमध्ये ती 800 निट्सपर्यंत वाढते. ही स्क्रीन फ्लिकर-फ्री आणि कमी निळ्या प्रकाशासाठी TÜV Rheinland प्रमाणित आहे. याची कार्यक्षमता ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 प्रोसेसर आणि ARM माली-G57 MC2 GPU द्वारे समर्थित आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड 16 वर चालतो आणि त्याला अँड्रॉइड 18 पर्यंत OS अपडेट्स मिळतील.
10.200mAh बॅटरी, मोटो पेन आणि एआय फिचर्स
मोटो पॅड 70 मध्ये 10,200mAh क्षमतेची बॅटरी असून त्यासोबत 68W क्षमतेचा पॉवर अडॅप्टर मिळतो. यामध्ये 13-मेगापिक्सलचा मागील कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा पुढील कॅमेरा आहे. चार स्पीकर्स डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतात आणि यात ड्युअल मायक्रोफोन सिस्टीम आहे. या टॅबलेटमध्ये सर्कल टू सर्च, एआय समरी आणि एआय कंटिन्यू रायटिंग यांसारखी एआय वैशिष्ट्ये, तसेच जेमिनी इंटिग्रेशनदेखील आहे.
यात 5G, Wi-Fi 5, Bluetooth 5.2, USB-C आणि पोगो-पिन कनेक्टर आहे. मोटो पेनमध्ये 4,096 स्तरांची दाब संवेदनशीलता, टिल्ट डिटेक्शन आणि पाम रिजेक्शन आहे. बॉक्समध्ये पेन आणि मोटो फोलिओ कीबोर्ड समाविष्ट आहेत. या टॅब्लेटचे वजन अंदाजे 530 ग्रॅम असून ते IP52 रेटेड आहे. कंपनी 2030 पर्यंत सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासनही देत आहे.
