AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8000mAh टायटन बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला नवीन 5G फोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच

रियलमी कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन जुनच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच करण्याच्या तयारीत आहेत. ज्यामध्ये 8000mAh क्षमतेची टायटन बॅटरी देण्यात आलेली आहे. तर 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले असणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची लाँच तारीख जाणून घेऊयात.

8000mAh टायटन बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला नवीन 5G फोन 'या' दिवशी भारतात होणार लाँच
realme
| Edited By: | Updated on: Jun 04, 2026 | 9:40 PM
Share

रियलमी कंपनीने गेल्या काही दिवसांपासून त्यांचा नवीन स्मार्टफोन एका मोठ्या बॅटरीसह बाजारपेठेत सादर करण्याच्या तयारीत आहेत. Realme P4R 5G असे नवीन स्मार्टफोनच नाव आहे. तर हा फोन कधी लाँच होईल याची उत्सकुता लागली असता कंपनीने या फोनच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. हे नवीन डिव्हाइस पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण सर्वप्रथम फोनच्या लाँचचे तपशील आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

रियलमी कंपनी 10 जून 2026 रोजी हा फोन भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे सादर करणार आहे. या नवीन डिव्हाइसमध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, सुधारित फोटोग्राफी क्षमता आणि एक अद्वितीय डिझाइन आहे. मध्यम-श्रेणी विभागात हा फोन एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

या नवीन Realme P4R 5G चे मुख्य फिचर्स म्हणजे त्याची 8,000mAh क्षमतेची टायटन बॅटरी. ही बॅटरी खास मार्केट सेगमेंटमध्ये सर्वात मोठी क्षमता असलेली आहे. एवढी मोठी बॅटरी असूनही कंपनीने हा फोन स्लिम आणि वजनाने हलका बनवला आहे.

रियलमी पी4आर 5जी ची वैशिष्ट्ये

अलीकडेच फोनच्या बॉक्सचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामधून त्याची जवळपास सर्व वैशिष्ट्ये उघड झाली आहेत. बॉक्सच्या फोटोवरून असे दिसून येते की या फोनमध्ये 8000mAh क्षमतेची मोठी सिलिकॉन-कार्बन बॅटरी असेल.

तर या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि HD+ डिस्प्ले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या फोनमध्ये कमाल ब्राइटनेस 1,200 nits पर्यंत असू शकते. तसेच या डिव्हाइसमध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 5,300mm² VC कूलिंग सिस्टीम असण्याचीही शक्यता आहे.

रियलमी पी४आर ५जी चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, Realme P4R मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर असण्याचीही शक्यता आहे.

Follow Us
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?