WhatsApp वापरताना सावधान ! ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास हॅकर्सकडून खासगी माहितीवर हल्ला होण्याची शक्यता

Rediroff.ru या लिंकद्वारे बँक तसेच इतर खासगी माहिती मिळवली जात आहे. याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.

WhatsApp वापरताना सावधान ! 'या' लिंकवर क्लिक केल्यास हॅकर्सकडून खासगी माहितीवर हल्ला होण्याची शक्यता
WHATSAPP
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 7:02 PM

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून अनेकांच्या WhatsApp वर एक लिंक येत आहे. या लिंकद्वारे मोठा धोका होत असल्याचे आता समोर आले आहे. Rediroff.ru या लिंकच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची खासगी तसेच वित्तीय माहिती चोरली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Rediroff.ru या लिंकद्वारे बँक तसेच इतर खासगी माहिती मिळवली जात असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जातेय.

काय आहे Rediroff.ru घोटाळा ?

मागील काही दिवसांपासून WhatsApp वर Rediroff.ru ही लिंक फॉरवर्ड केली जात आहे. या लिंकच्या माध्यमातून WhatsApp लोकांची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये Rediroff.ru लिंकवर जाऊन क्लिक करण्यास सांगण्यात येते. लिंकवर क्लिक केल्यानंतर एका सर्वेच्या माध्यमातून बक्षिस जिंकता येईल असे वापरकर्त्यांना सांगण्यात येते. त्यासाठी काही सोपे प्रश्न विचारले जातात. WhatsApp या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर वापरकर्त्यांना आणखी एका नव्या वेबसाईटवर नेले जाते. तिथे नाव, पत्ता, वय तसेच बँकेचे डिटेल्स तसेच अन्य खासगी माहिती विचारण्यात येते. नंतर याच माहितीचा वापर आर्थिक देवानघेवाणीसाठी करण्यात येत आहे. तसेच ही माहिती डार्क वेबवर विकण्यात येऊ शकते, असे सांगितले जात आहे. याच माहितीचा वापर सायबर गुन्हेगारी विश्वात स्पॅम आणि मालवेअर असलेले मेल पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो. WhatsApp वापरकर्त्यांच्या मोबाईलवर पीयूएदेखील इन्स्टॉल केले जाऊ शकते.

Rediroff.ru WhatsApp स्कॅमपासून स्वत:ला कसे वाचवाल ?

WhatsApp वर युआरएलच्या माध्यमातून Rediroff.ru ही लिंक आली तर त्याला त्वरित स्पॅम म्हणून मार्क करावे. तसेच आपण या लिंकवर चुकून क्लिक केले असेल तर तुमचा मोबाईल तसेच इतर कोणतेही उपकरण अॅडवेअर, मालवेअर तसेच पीयूएसाठी स्कॅन करुन घ्यावे. तसेच प्रलोभण देणाऱ्या कोणत्याही जाहिरातीवर क्लिक करु नये. तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारच्या लिंक आल्यास बाकीचे संदिग्ध अॅप त्वरित अनईन्स्टॉल करावे. यामुळे धोकाधडीपासून स्वत:ला वाचवता येऊ शकते.

इतर बातम्या :

4GB पेक्षा जास्त रॅम, i3 प्रोसेसरवाले लॅपटॉप अवघ्या 19 हजारात खरेदीची संधी, ऑफरमध्ये HP, Lenovo चे पर्याय

5G Update: प्रतीक्षा संपली, नवीन वर्षात 13 शहरांमध्ये सुरु होणार सेवा, टेस्टिंग अंतिम टप्प्यात

Simless Phone : Appleचा नवा iPhone विशेष तंत्रज्ञानानं सज्ज! सिमकार्डशिवाय मोबाइलवर बोलता येणार..!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.