AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nikon DSLR Camera : फोटोग्राफर्ससाठी वाईट बातमी! Nikonचे DSLR कॅमेरे बंद होणार? कारण जाणून घ्या…

Nikkei Asia अहवालानं असंही सुचवलंय की,  नवीन SLR मॉडेलचे उत्पादन थांबेल. कंपनीनं विद्यमान SLR मॉडेलचे उत्पादन आणि विक्री सुरू ठेवली आहे. Nikon SLR कॅमेरा 2020 मध्ये आला आणि तेव्हापासून कोणतेही नवीन मॉडेल आलेले नाही.

Nikon DSLR Camera : फोटोग्राफर्ससाठी वाईट बातमी! Nikonचे DSLR कॅमेरे बंद होणार? कारण जाणून घ्या...
निकॉनImage Credit source: social
| Updated on: Jul 13, 2022 | 1:20 PM
Share

मुंबई : कॅमेरा म्हटलं की निकॉन नाव समोर यायचं. निकॉनचा डीएसएलआर कॅमेरा जुन्या पिढीकडे अजूनही आहे. फोटोग्राफर्स देखील या कॅमेऱ्याला जपून ठेवतात. कारण, यासोबत अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत, मात्र, निकॉन कंपनी (Nikon) नवीन डीएसएलआर (DSLR) कॅमेरे (Camera) बनवणार नाही, असा एक अहवाल आलाय. ऐकूण आश्चर्य वाटलं ना, ही फोटोग्राफर्ससाठी वाईट बातमी असली तरी त्या अहवालानुसार हे सत्य आहे. या बातमीमुळे जगभरातील छायाचित्रकारांना धक्का बसू शकतो. Nikon साठ वर्षांहून अधिक काळापासून डीएसएलआर कॅमेरे बनवत आहे. आता कंपनी त्याऐवजी पुढच्या पिढीतील मिररलेस कॅमेऱ्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचंही त्या अहवालात नमुद आहे. पण, जुन्या शैलीतील SLR कॅमेऱ्यांच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी नाही. कारण, अजूनही तोच कॅमेरा अनेकांच्या हातात बसलाय. दुसरा कॅमेरा जुनी पिढी हातातही घेत नाही. मात्र, आता नव्या पिढीसाठी निकॉन मिररलेस कॅमेरा आणणार असल्याचं त्या अहवालात नमुद करण्यात आलंय.

कंपनी म्हणते निकॉनची विक्री सुरूच राहणार

ही माहिती Nikkei Asia च्या अहवालातून आली आहे आणि Nikon ने याची पुष्टी केलेली नाही. निकॉनने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रकही जारी केले आहे. निकॉनने सांगितले की, आमच्याकडे एसएलआर काढण्याबाबत एक मीडिया लेख होता. हा मीडिया लेख केवळ अनुमान आहे आणि Nikon ने या संदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. Nikon डिजिटल SLR चे उत्पादन, विक्री आणि सेवा सुरू ठेवतो. त्यामुळे निकॉन डीएसएलआर कॅमेऱ्यांची विक्री सुरूच राहणार आहे.

नवीन कॅमेरा येणार?

निकॉन नवीन SLR मॉडेल विकसित करेल याची पुष्टी करत नाही. त्यामुळे अजूनही एक प्रकारचं संभ्रम आहे. दुसरीकडे, Nikkei Asia अहवालानं असंही सुचवलंय की,  नवीन SLR मॉडेलचे उत्पादन थांबेल. कंपनीनं विद्यमान SLR मॉडेलचे उत्पादन आणि विक्री सुरू ठेवली आहे. Nikon SLR कॅमेरा 2020 मध्ये आला आणि तेव्हापासून कोणतेही नवीन मॉडेल आलेले नाही. कंपनीने काही काळापूर्वी आपले Nikon D3500 आणि Nikon D5600 कॅमेरे देखील बंद केले आहेत.

मिररलेस कॅमेरा

रिपोर्टनुसार, प्रतिस्पर्धी कॅमेरा कंपनी कॅनन देखील असेच करेल. Nikon आणि Canon दोन्ही आता मिररलेस कॅमेर्‍यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. ज्यांची लोकप्रियता वाढत आहे. मिररलेस कॅमेरे हे अवजड DSLR कॅमेर्‍यांपेक्षा हलके आणि अधिक कॉम्पॅक्ट असतात आणि जवळपास SLR कॅमेर्‍यांसारखेच कार्य करतात. मात्र, या कॅमेऱ्यांना सर्वात मोठा धोका स्मार्टफोनचा आहे. स्मार्टफोन कॅमेर्‍यांमुळे पॉइंट-अँड-शूट डिजिटल कॅमेरे बंद झाले आहेत.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.