जुन्या फोनचे मिळणार जादा दाम, येथे करता येईल विक्री

Old Phone Sell | तुमचा जुना मोबाईल म्हणजे निव्वळ कचरा नाही बरं! चांगल्या कंडिशनमधील स्मार्टफोनला पण चांगले दाम मिळतात. त्यामुळे जुना झाला म्हणून एकदमच कमी किंमतीत मोबाईल विक्री करु नका. तुम्हाला या स्मार्टफोनची चांगली किंमत मिळू शकते. ते पण एकदम सोप्या पद्धतीने, कोणते आहेत ते प्लॅटफॉर्म जिथे मिळेल चांगला दाम?

जुन्या फोनचे मिळणार जादा दाम, येथे करता येईल विक्री
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 10:59 AM

नवी दिल्ली | 7 डिसेंबर 2023 : मोबाईल जुना झाला म्हणजे तो मिळेल त्या किंमतीला विक्री करु नका. चांगल्या कंडिशनमधील स्मार्टफोनचे चांगले दाम वसूल करता येतात. विशेष म्हणजे त्यासाठी या दुकानावरुन त्या दुकानावर घासघीश करावी लागत नाही. देशात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जुना स्मार्टफोन विक्री करणे एकदम सोपे आहे. या प्लॅटफॉर्मवर तुमच्या जुन्या स्मार्टफोनची माहिती अपडेट केली की, त्याच्या किंमतीचा लागलीच अंदाज घेता येतो. स्मार्टफोनला चांगले दाम मिळत असतील तर तुम्हाला तो विक्री पण करता येतो. हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यासाठी एकदम जोरदार आहेत.

घरबसल्या करा विक्री

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जुना मोबाईल विक्री करण्यासाठी कुठे पण जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या स्मार्टफोन विक्री करु शकता. तुम्ही एकदा जुना स्मार्टफोन विक्री करण्याचे निश्चित केले की, योग्य माहिती भरल्यानंतर तुम्हाला लवकरच पेमेंट मिळते. जुन्या फोनचे योग्य दाम मिळू शकतात. फोन विक्री करण्याचा हा एक सुरक्षित प्रकार आहे.

हे सुद्धा वाचा

या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री करा जुना स्मार्टफोन

  1. OLX : जुना स्मार्टफोन विक्री करण्यासाठी अनेक जण थेट ओएलएक्सवर जातात. या संकेतस्थळाचा सर्वाधिक वापर होतो. यावर जाहिरात करण्याची पद्धत पण सोपी आहे. तुम्हाला यावर योग्य ग्राहक मिळू शकतो. चांगली किंमत मिळाल्यास आणि पडताळ्यानंतर तुम्हाला स्मार्टफोन विक्री करता येतो.
  2. Cashify : हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी जुने मोबाईल विक्रीस येतात. या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना त्यांच्या मोबाईलची योग्य किंमत कळते. या ठिकाणी घरबसल्या फोनची विक्री करु शकता. हा प्लॅटफॉर्म फ्री पिकअपची सुविधा देतो.
  3. Quikr : या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही सहज जाहिरात करु शकता. हा प्लॅटफॉर्म तुम्हाला चांगला भाव मिळवून देण्यास मदत करतो. या ठिकाणी सुरक्षित पेमेंट गेटवे पण मिळतो. त्यामुळे तुम्हाला सहज रक्कम मिळू शकते.
  4. Budli.in : जुन्या फोनसह इलेक्ट्रॉनिक आयटम विक्रीसाठी ही एक खास वेबसाईट आहे. याठिकाणी वापरलेल्या मोबाईलची खरेदी-विक्री करण्यात येते. तुम्हाला या ठिकाणी किंमत कळते. डील पूर्ण झाली तर फ्री पिकअप सर्व्हिस मिळते.
  5. Cashkar : या वेबसाईटचा मुख्य उद्देश रिसायकल, वस्तूचा पूनर्वापर करणे हा आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्राहक जुना स्मार्टफोन अथवा डिव्हाईस सहज विक्री करु शकतो. जर तुम्हाला योग्य दाम मिळाले तर येथे फोन विक्री करु शकता.
  6. InstaCash : इंस्टाकॅशवर पण फ्री पिकअप सर्व्हिस मिळते. हे मोबाईल एप, जुन्या स्मार्टफोनची किंमत दाखवते. जर तुम्हाला ही डील योग्य वाटल्यास, स्मार्टफोनची विक्री करता येते.
  7. Amazon : ई-कॉमर्स प्लेटफॉर्म अमेझॉनवर पण जुना मोबाईल विक्रीची सुविधा मिळते. या ठिकाणी योग्य दाम मिळाल्यास तुम्हाला मोबाईल विक्री करता येईल. कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अगोदर तुमच्या मोबाईलला किती किंमत मिळते याचा पडताळा घ्या. किंमत तपासा. समोरचा ग्राहक स्मार्टफोनची किंमत, ब्रँड, मॉडेल, कंडिशन आणि त्याच्या आवडीनुसार खरेदी करतो, हे पण लक्षात घ्या.
Non Stop LIVE Update
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?
रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार, बच्चू कडू यांचा मोठा दावा काय?.
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका.
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.