AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro

वनप्लसने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कंपनी आपला आगामी स्मार्टफोन वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो 23 मार्च रोजी बाजारात आणणार आहे

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, 'या' दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro
OnePlus 9
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Mar 09, 2021 | 7:41 AM
Share

मुंबई : वनप्लसने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कंपनी आपला आगामी स्मार्टफोन वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो 23 मार्च रोजी बाजारात आणणार आहे. त्याच दिवशी, वनप्लस 9 लाइट आणि वनप्लस 9R देखील लाँच केले जातील. वनप्लसने आपल्या अधिकृत घोषणेत म्हटले आहे की, फोनचे हार्डवेअर आणि कॅमेरा अधिक शक्तिशाली बनविण्यासाठी कंपनी Hasselblad बरोबर काम करत आहे. (OnePlus 9 and OnePlus 9 Pro will launch on March 23, smartphone maker can give MoonShot Feature)

वनप्लसने म्हटले आहे की, ते वनप्लस 9 सिरीजमध्ये कस्टम सोनी IMX789 सेन्सर वापरणार आहेत. हा सेन्सर प्रायमरी कॅमेराच्या रुपात उपलब्ध असेल. कंपनीने म्हटले आहे की, आतापर्यंत कोणत्याही वनप्लस डिव्हाइसमधील हा सर्वात अॅडव्हान्स मेन कॅमेरा सेन्सर असेल. नवीन सेन्सर हा जुन्या सेन्सर्सच्या तुलनेत 64 पटीने अधिक दमदार असेल. ज्याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक रंग आणि प्रत्येक फोटो अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करु शकाल.

मूनशॉट घेता येणार?

मूनशॉटबद्दल बोलायचे झाल्यास या सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये लाँग झूम लेन्स दिली जाऊ शकते. हे फीचर यापूर्वी सॅमसंग आणि हुवावे सिरीजमध्ये पाहिलं आहे. ही लेन्स 10X ऑप्टिकल झूमसह डिझाईन केलेली असते. या फोनचा कॅमेरा इतका दमदार असेल असा दावा सध्या करता येणार नाही, परंतु या कॅमेरांना टक्कर देऊ शकेल असा कॅमेरा देण्याचा प्रयत्न वनप्लस कंपनी करत आहे.

वनप्लस (OnePlus) कंपनी त्यांची नवीन फ्लॅगशिप वनप्लस 9 सिरीज 23 मार्चला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत कंपनी नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) हा स्मार्टफोनदेखील लाँच करू शकते. अँड्रॉयड सेंट्रलच्या मते, नॉर्ड 2 मीडियाटेकचा डायमेन्शन 1200 चिपसेट सपोर्टेड फोन असेल.

मीडियाटेकचा फ्लॅगशिप डायमेन्शन 1200 एसओसी चिपसेट 6 एनएम मॅन्युफॅक्चर रिंग प्रक्रियेवर आधारित एक ऑक्टा-कोर चिपसेट आहे, ज्याचा स्पीड जास्तीत जास्त 3 गीगाहर्ट्ज इतकी आहे. या चिपसेटमध्ये 5 जी आणि वायफाय 6 चा सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन कॉर्टेक्स ए478 परफॉरमन्स कोअरसह सादर केला जाणार आहे. ज्याचा जास्तीत जास्त स्पीड 3.0 गीगाहर्ट्ज इतका असेल. तीन एक्स्ट्रा ए78 कोरचा स्पीड 2.6 गीगाहर्ट्झ इतका असेल.

अशी असेल वनप्लस 9 सिरीज

वनप्लस 9 बाबत अनेक लीक्सद्वारे वेगवेगळी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. नुकत्याच लीक झालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 स्नॅपड्रॅगन 888 SoC द्वारे चालणारा स्मार्टफोन असेल. यामध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, OnePlus 9 Lite चा समावेश आहे. टिपस्टर TechDroider द्वारे मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 मध्ये एक 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 402 पीपीआय पिक्सेल डेन्सिटीसह 6.55 इंचांचा फुल-एचडी + (1080 x 2400 पिक्सेल) डिस्प्ले (Full HD+ Display) दिला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

देशात ‘या’ दोन शहरांत 5G टॉवर आले, जाणून घ्या कधी मिळणार 5G सेवा

Oneplus चा मोठा निर्णय, ‘हे’ गॅजेट्स बंद करणार, परवडणाऱ्या दरात ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीज खरेदीची शेवटची संधी

लवकरच लाँच होणार OnePlus Nord 2, या फोनमध्ये काय असेल खास

(OnePlus 9 and OnePlus 9 Pro will launch on March 23, smartphone maker can give MoonShot Feature)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?