दमदार फीचर्स आणि 2 वर्षांच्या वॉरंटीसह OnePlus 9 सिरीज लाँच होणार

वनप्लसने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कंपनी आपला आगामी स्मार्टफोन वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो 23 मार्च रोजी बाजारात आणणार आहे

दमदार फीचर्स आणि 2 वर्षांच्या वॉरंटीसह OnePlus 9 सिरीज लाँच होणार
OnePlus 9 Series
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 11:26 AM

मुंबई : वनप्लसने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, कंपनी आपला आगामी स्मार्टफोन वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो 23 मार्च रोजी बाजारात आणणार आहे. त्याच दिवशी, वनप्लस 9 लाइट आणि वनप्लस 9R देखील लाँच केले जातील. वनप्लसने आपल्या अधिकृत घोषणेत म्हटले आहे की, फोनचे हार्डवेअर आणि कॅमेरा अधिक शक्तिशाली बनविण्यासाठी कंपनी Hasselblad बरोबर काम करत आहे. (OnePlus 9 Series Confirmed To Get Two Years Warranty)

दरम्यान, लाँचिंगपूर्वीच कंपनीने या फोनबाबत वेगवेगळे खुलासे केले आहेत. वनप्लसच्या या नव्या सिरीजबाबत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 वर दोन वर्षांची वॉरंटी दिली जाणार आहे. वनप्लसचे सीईओ पीट लाऊ यांनी याबाबतची पुष्टी केली आहे. दरम्यान, ही वॉरंटी जगभरातील ग्राहकांसाठी असणार आहे की, केवळ चिनी ग्राहकांसाठीच असणार, याबाबत पीट यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. बहुतांशी स्मार्टफोन कंपन्या केवळ 1 वर्षाच्या वॉरंटीसह स्मार्टफोन लाँच करत असतात, अशा परिस्थितीत वनप्लसचं हे पाऊल जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल, असं बोललं जात आहे.

दरम्यान, वनप्लसने म्हटलं आहे की, ते वनप्लस 9 सिरीजमध्ये कस्टम सोनी IMX789 सेन्सर वापरणार आहेत. हा सेन्सर प्रायमरी कॅमेराच्या रुपात उपलब्ध असेल. कंपनीने म्हटले आहे की, आतापर्यंत कोणत्याही वनप्लस डिव्हाइसमधील हा सर्वात अॅडव्हान्स मेन कॅमेरा सेन्सर असेल. नवीन सेन्सर हा जुन्या सेन्सर्सच्या तुलनेत 64 पटीने अधिक दमदार असेल. ज्याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक रंग आणि प्रत्येक फोटो अधिक चांगल्या प्रकारे कॅप्चर करु शकाल.

मूनशॉट घेता येणार?

मूनशॉटबद्दल बोलायचे झाल्यास या सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये लाँग झूम लेन्स दिली जाऊ शकते. हे फीचर यापूर्वी सॅमसंग आणि हुवावे सिरीजमध्ये पाहिलं आहे. ही लेन्स 10X ऑप्टिकल झूमसह डिझाईन केलेली असते. या फोनचा कॅमेरा इतका दमदार असेल असा दावा सध्या करता येणार नाही, परंतु या कॅमेरांना टक्कर देऊ शकेल असा कॅमेरा देण्याचा प्रयत्न वनप्लस कंपनी करत आहे.

वनप्लस (OnePlus) कंपनी त्यांची नवीन फ्लॅगशिप वनप्लस 9 सिरीज 23 मार्चला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत कंपनी नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) हा स्मार्टफोनदेखील लाँच करू शकते. अँड्रॉयड सेंट्रलच्या मते, नॉर्ड 2 मीडियाटेकचा डायमेन्शन 1200 चिपसेट सपोर्टेड फोन असेल.

मीडियाटेकचा फ्लॅगशिप डायमेन्शन 1200 एसओसी चिपसेट 6 एनएम मॅन्युफॅक्चर रिंग प्रक्रियेवर आधारित एक ऑक्टा-कोर चिपसेट आहे, ज्याचा स्पीड जास्तीत जास्त 3 गीगाहर्ट्ज इतकी आहे. या चिपसेटमध्ये 5 जी आणि वायफाय 6 चा सपोर्ट मिळेल. हा स्मार्टफोन कॉर्टेक्स ए478 परफॉरमन्स कोअरसह सादर केला जाणार आहे. ज्याचा जास्तीत जास्त स्पीड 3.0 गीगाहर्ट्ज इतका असेल. तीन एक्स्ट्रा ए78 कोरचा स्पीड 2.6 गीगाहर्ट्झ इतका असेल.

अशी असेल वनप्लस 9 सिरीज

वनप्लस 9 बाबत अनेक लीक्सद्वारे वेगवेगळी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. नुकत्याच लीक झालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 स्नॅपड्रॅगन 888 SoC द्वारे चालणारा स्मार्टफोन असेल. यामध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, OnePlus 9 Lite चा समावेश आहे. टिपस्टर TechDroider द्वारे मिळालेल्या माहितीनुसार वनप्लस 9 मध्ये एक 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 402 पीपीआय पिक्सेल डेन्सिटीसह 6.55 इंचांचा फुल-एचडी + (1080 x 2400 पिक्सेल) डिस्प्ले (Full HD+ Display) दिला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

10000 हून कमी किंमत असलेल्या Realme च्या ‘या’ फोनवर 1000 रुपयांची सूट

Oppo लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार, सॅमसंग आणि गुगलही स्पर्धेत

8GB/128GB, 108MP कॅमेरासह Realme दमदार स्मार्टफोन लाँच करणार

(OnePlus 9 Series Confirmed To Get Two Years Warranty)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.