10000 हून कमी किंमत असलेल्या Realme च्या ‘या’ फोनवर 1000 रुपयांची सूट

रियलमीच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी + (720x1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे आणि त्याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20 : 9 इतका आहे.

10000 हून कमी किंमत असलेल्या Realme च्या 'या' फोनवर 1000 रुपयांची सूट
Realme C15

मुंबई : तुम्हाला जर बजेट स्मार्टफोन घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या Realme च्या एका स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे या स्मार्टफोनवर एक चांगली ऑफर देण्यात आली आहे. हँडसेट निर्माता कंपनी रियलमीच्या या स्मार्टफोनच्या महत्त्वाच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 6000 एमएएच बॅटरी आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन 1000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. Realme C15 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. (Realme C15 available with RS 1000 discount with prepaid online payment)

स्पेसिफिकेशन्स

रियलमीच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी + (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे आणि त्याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20 : 9 इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यामध्ये मीडियाटेक हेलिओ जी 35 चिपसेटसह 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

कॅमेरा

Realme C15 या फोनच्या रियर पॅनेलवर क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 6000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme C15 Price in India

रियलमी सी 15 च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये इतकी आहे. परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये इतकी आहे. परंतु हा फोन तुम्ही 9,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Realme India च्या अधिकृत वेबसाईटवरुन हा फोन खरेदी करताना तुम्हाला प्रिपेड ट्रान्झॅक्शन करावं लागेल (ऑनलाईन पेमेंट करावं लागेल), तरच तुम्ही हा फोन डिस्काऊंटसह खरेदी करु शकता. तसेच हा फोन दोन कलर ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे. यामध्ये पॉवर सिल्व्हर आणि पॉवर ब्लू या दोन रंगांचा समावेश आहे.

इतर बातम्या

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro

Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट

Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार

(Realme C15 available with RS 1000 discount with prepaid online payment)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI