Nord CE 5G चे फीचर्स लीक, जाणून घ्या कसा असेल OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन

| Updated on: May 29, 2021 | 7:13 AM

वनप्लस नॉर्ड CE 5G या स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत कंपनीने पुष्टी केली आहे. परंतु कंपनीने या फोनच्या फीचर्सबाबत माहिती दिलेली नाही.

Nord CE 5G चे फीचर्स लीक, जाणून घ्या कसा असेल OnePlus चा किफायतशीर स्मार्टफोन
OnePlus Nord CE 5G
Follow us on

मुंबई : वनप्लस नॉर्ड CE 5G या स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत कंपनीने नुकतीच पुष्टी केली आहे. कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांनी म्हटले आहे की, वनप्लस डिव्हाइस 10 जूनला भारत आणि युरोपमध्ये लाँच केलं जाईल. गेल्या वर्षी लाँच झालेल्या वनप्लस नॉर्डचं नेक्स्ट व्हर्जन म्हणून वनप्लस नॉर्ड CE 5G लाँच केला जात आहे. मुलाखतीदरम्यान लाऊ यांनी वनप्लस नॉर्ड CE 5G च्या वैशिष्ट्यांविषयी खुलासा केला नाही. (OnePlus Nord CE 5G Features leaked, find out datails of affordable smartphone)

लाऊ यांनी एक गोष्ट निश्चितपणे सांगितली की, हा फोन स्वस्त दरात लाँच केला जाईल. ते म्हणाले की, आम्ही या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत. अशा परिस्थितीत भारतात या फोनची किंमत 20,000 रुपये इतकी असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा 5G स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर हा फोन Amazon इंडियाच्या वेबसाईटवरुन खरेदी करता येईल.

लाऊ म्हणाले की, कंपनी या वर्षाच्या अखेरीस नॉर्ड N200 5 जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. तथापि, हा फोन केवळ अमेरिका आणि कॅनडामध्ये लाँच केला जाईल. परंतु यावेळी लाऊ यांनी या फोनच्या स्पेक्सबद्दल कोणतीही माहिती उघड केली नाही.

फीचर्स

वनप्लस नॉर्ड CE 5 जी चे फीचर्स लीक झाले आहेत. या डिव्हाईसला नॉर्ड N10 5 जी चं नेक्स्ट व्हर्जन म्हटलं आहे. लीक झालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 6.49 इंचांचा डिस्प्ले आणि पंचहोल कटआउट दिला जाऊ शकतो. याची फ्लेक स्क्रीन पूर्णपणे स्लिम असेल आणि हा फोन टॉप बेझल्ससह सुसज्ज असेल.

या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा आणि ग्लॉसी बॅक देण्यात येईल. डिव्हाइसमध्ये साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि हा फोन रियर माउंटसह येईल. त्याच वेळी, फोनमध्ये 3.5mm जॅक देण्यात येईल. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, वनप्लस कंपनी ग्राहकांना एक गिफ्ट देऊ शकते. कंपनी वनप्लस टीव्ही U1S लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा टीव्ही तीन वेगवेगळ्या आकारात भारतात लाँच केला जाईल.

कसा आहे OnePlus Nord N10 5G?

या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. एसडी कार्डच्या मदतीने फोनचं स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे. सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

दमदार बॅटरी

नॉर्ड N10 5G अँड्रॉयड 10 वर आधारित ऑक्सीजन ओएस 10.5 आऊट ऑफ दी बॉक्सवर काम करतो. या फोनमध्ये 4300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30T फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची किंमत 21,990 रुपये इतकी आहे.OnePlus

इतर बातम्या

वीजेशिवाय चालणारे AC बाजारात, दर महिन्याला 4200 रुपयांच्या वीजबिलाची बचत करणार

Flipkart Electronic sale : सॅमसंग, रियलमी आणि पोकोच्या ‘या’ स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काऊंट

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…

(OnePlus Nord CE 5G Features leaked, find out datails of affordable smartphone)