जबरदस्त फिचर्ससह Oppo चा ‘हा’ 5G स्मार्टफोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
ओप्पोच्या या फोनमध्ये 6500 एमएएच बॅटरी आणि जलद चार्जिंग आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6000 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि 6 जीबी पर्यंत रॅमला सपोर्ट करतो. तर ओप्पोच्या या फोनची किंमत आणि जबरदस्त फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.

चिनी स्मार्टफोन कंपनी Oppo ने भारतात त्यांचा नवीन बजेट फोन, Oppo A6x 5G लाँच केला आहे. हा फोन 6500mAh बॅटरी आणि जलद चार्जिंगसह लॉंच करण्यात आला आहे. हा मीडियाटेक डायमेन्सिटी 6000 प्रोसेसरने चालवला आहे आणि 6GB पर्यंत रॅमला सपोर्ट करतो. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण ओप्पोच्या या नवीन फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊयात.
Oppo A6x 5G ची भारतातील किंमत
भारतात, Oppo A6x 5G हा आइस ब्लू आणि ऑलिव्ह ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. बेस 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपयांपासून सुरू होते. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपयांपासून सुरू होते. 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. हा फोन Amazon, Flipkart, Oppo India ऑनलाइन स्टोअर आणि इतर ऑफलाइन रिटेल आउटलेटवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Oppo A6x 5G: स्पेसिफिकेशन्स
Oppo A6x 5G मध्ये 6.75-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1,125 nits पर्यंत आहे. हा फोन Android 15-आधारित ColorOS 15 वर चालतो आणि MediaTek Dimensity 6300 चिपसेटद्वारे समर्थित आहे, ज्यामध्ये 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे.
कॅमेरा सपोर्टबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपचा समावेश आहे. ज्यामध्ये 13मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरे 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक आणि इतर अनेक आवश्यक सेन्सर्स आहेत. हे डिव्हाइस बजेट सेगमेंटमध्ये डिस्प्ले, कॅमेरा आणि परफॉर्मन्सचा चांगला समतोल प्रदान करते.
Oppo A6x 5G या स्मार्टफोनमध्ये 45W वायर्ड SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.4, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक यांचा समावेश आहे.
